चेकअपला जातो सांगून गेले ते परत आलेच नाहीत', लक्ष्मीकांतच्या आठवणीत अभिनेत्री भावुक

    06-Dec-2024
Total Views | 136
 
berde
 
 
 
मुंबई : विनोदवीर, टायमिंगचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट पाहिलेला आणि त्यांचा चाहता नसलेला एकही मराठी प्रेक्षक सापडणार नाही. अनेक सुपरहिट मराठी चित्रपट, नाटक देणाऱ्या लक्ष्मीकांत यांचा पछाडलेला हा चित्रपट शेवटचा ठरला. या चित्रपटात त्यांच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्री नीलम शिर्के यांनी नुकत्याच एका मुलाखतीत लक्ष्मीकांत यांच्यासोबत काम करतानाचे अनुभव सांगितले.
 
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत नीलम शिर्के यांनी लक्ष्मीकांत यांच्याविषयीची भावुक आठवण सांगितली. नीलम म्हणाल्या की,"पछाडलेला चित्रपटामध्ये लक्ष्मामामांसोबत छान ट्यूनिंग झालं. ते सीनियर जरी असले आमचे तरी आम्हाला चाचपडून बघायचे की चांगले आर्टिस्ट आहेत की नाही की, उगाचच यंगस्टर्स म्हणून उचलून आणले आहेत." 
 
लक्ष्मीकांत यांच्याविषयीची भावुक आठवण सांगताना नीलम पुढे म्हणाल्या की, "पछाडलेलानंतर आम्ही एकत्र नाटक करायचं ठरवलं. कुमार सोहोनी दिग्दर्शक होते नाटकाचे. ‘मी बबन प्रामाणिक’ असं नाटकाचं नाव होतं. या नाटकात मी, लक्ष्मामामा, प्रसाद ओक आणि बाकी सगळी टीम होती. आम्ही त्याच्या रिहर्सल सुरु केल्या. लक्ष्यामामा आम्हाला खूप मार्गदर्शन करायचे. त्यावेळी इथे नको उभी राहू, असं कर, तसं कर.. असं लक्ष्यामामा आम्हाला सांगायचा. त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव होता. त्या नाटकाचे ते सुपरस्टार होते. आम्ही त्यावेळी मालिका वगैरे करायचो पण एवढं नाव नव्हतं." "एक दिवस लक्ष्यमामा रिहर्सलला आले आणि म्हणाले, मी थोडासा आराम करतो.. मला बरं वाटत नाहीये.. तासभर रिहर्सल केली असेल त्यानंतर ते कुमार सोहोनींना सांगून आराम करायला घरी गेले. दुसऱ्या दिवशीही आले आणि त्यांनी कुमार सोहोनींना खालूनच फोन लावला. मी जरा चेकअप करुन येतो, मला कालपासून बरं वाटत नाहीये, असं ते म्हणाले. त्यावेळी ते जे चेकअप करायला गेले त्यानंतर आम्हाला कधीच भेटले नाहीत. त्यावेळी आम्ही लास्ट टाइम लक्ष्यामामाला बघितलं." "बालपणीच्या स्टेजपासून आम्ही त्यांना बघत आलोय त्यानंतर त्यांच्यासोबत काम करणं हा खूप छान अनुभव होता. आणि अचानक कळते की लक्ष्यामामा नाहीत.आम्ही रिहर्सल करतोय. ते चेकअपला गेलेत. ४ दिवसांनी परत येतील आणि १५ दिवसांनी आमचं नाटक ओपन होणार, ही खूप साधी गोष्ट होती. आणि अचानक... लक्ष्यामामा नाहीत हा फार मोठा धक्का होता..", लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयीची आठवण सांगताना नीलम भावूक झाल्या होत्या.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121