प्लँटफॉर्म तिकीटावर पुन्हा तात्पुरती बंदी

गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने उचलले पाऊल

    03-Dec-2024
Total Views | 22

central railway
मुंबई,दि.३: प्रतिनिधी मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणाऱ्या गर्दीचे उपाययोजना करण्यासाठी विविध निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. याचाच भाग म्हणून मध्य रेल्वे शुक्रवार,दि. ६ डिसेंबर रोजी निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालणार आहे. प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी नियंत्रित करणे आणि स्थानक परिसरात प्रवाशांची सुरळीत हालचाल सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवरील निर्बंध हे सोमवार, २ ते ९ डिसेंबरपर्यंत लागू असतील. केवळ प्रवास सुलभ व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. दरम्यान सुरळीत आणि सुरक्षित प्रवास अनुभवण्यासाठी प्रवाशांनी त्यानुसार नियोजन करावे आणि नवीन नियमांचे पालन करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
स्थानकाची नावे

मुंबई विभाग: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि कल्याण

भुसावळ विभाग:
बडनेरा, अकोला, नांदुरा, मूर्तिजापूर, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक

नागपूर विभाग:
नागपूर आणि वर्धा

पुणे विभाग:
पुणे

सोलापूर विभाग
: सोलापूर
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121