‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट पाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "चित्रपट निर्मात्यांनी..."

    03-Dec-2024
Total Views | 318
 
pm modi
 
 
मुंबई : गोध्रामधील साबरमती एक्सप्रेसमध्ये २००२ साली घडलेल्या सत्य घटनेवर आधारित ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आयोजित करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आदी अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान, हा चित्रपट पंतप्रधानांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत पाहिला असून चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता विक्रात मेस्सी देखील स्क्रिनिंगसाठी हजर होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपट निर्मात्यांचं कौतुक केलं असून त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल आपलं मत सोशल मिडियावर व्यक्त केलं आहे.
 
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चित्रपट पाहिल्यानंतर विक्रांत म्हणाला की, संसद भवनात बालयोगी सभागृहात 'द साबरमती रिपोर्ट' चं स्पेशल स्क्रीनिंग पंतप्रधान मोदींसाठी आयोजित करण्यात आलं होतं. आणि त्यांच्यासोबत द साबरमती रिपोर्ट पाहण्याची संधी मिळाली हा माझ्या करिअरसाठी हाय पॉईंट आहे", अशा भावना विक्रांतने व्यक्त केल्या.
 
 
 
‘१२वी फेल’ या चित्रपटामुळे खरंतर अधिक लोकप्रियता मिळवणारा अभिनेता विक्रांत मेस्सी याने नुकतीच सोशल मिडियावर अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. विक्रांतने पोस्टमध्ये लिहिले आहे की, "गेले काही वर्ष माझ्यासाठी फार वेगळी आणि विलक्षण आहेत. ज्यांनी मला कायम सपोर्ट केला त्या सर्वांचे मी आभार मानतो. परंतु मी आयुष्यात जसं पुढे जातोय तसं मला कळालं की एक पती, बाप, मुलगा आणि अभिनेता म्हणून आत्मपरिक्षण करायची गरज आहे. त्यामुळे पुन्हा घरी परतायची वेळ झाली आहे. २०२५ मध्ये आपण शेवटचे एकदा भेटू. जोवर योग्य वेळ येत नाही. माझे २ चित्रपट आणि असंख्य आठवणी आहेत. पुन्हा एकदा सर्वांचे खूप आभार. कायम मी तुमचा ऋणी असेन."
 
२००२ साली घडलेल्या गोध्रा हत्याकांडावर आधारित ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटाची कथा बेतली असून धीरज सरना यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात अभिनेता विक्रांत मेस्सी, राशी खन्ना, रिद्धी डोगरा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121