भारतीयांनो लक्षात घ्या! काश्मीर-अरुणाचल नकाशातून गायब ही चूक नव्हे हे तर काँग्रेसी मनसुबेच!

    26-Dec-2024
Total Views | 127
 
Kashmir - Arunachal Partition
 
श्रीनगर : देशद्रोही कृत्य करणारा काँग्रेस पक्ष रोज नव्याने काहीना काही कारणाने आपली लाज चव्हाट्यावर आणत आहे. काँग्रेसने एका पोस्टरमध्ये भारताच्या नकाशातून काश्मीर-अरुणाचल प्रदेश ही राज्ये नकाशातून काढून टाकण्यात आल्याचे दिसून येते. या प्रकरणाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून हे फोटो बेळगावात झालेल्या काँग्रेसच्या संमेलनातील आहेत. 
 
व्हायरल फोटोमध्ये भारताचा नकाशा असून नकाशातून काश्मीर-अरुणाचल प्रदेश ही दोन राज्ये वगळण्यात आल्याचे दिसून येत आहे. याचा अर्थ असा की, काँग्रेसला काश्मीर-अरुणाचल प्रदेश हे राज्य भारतापासून तोडण्याचा मनसुबा असल्याचे फोटोतून स्पष्ट झाले आहे.
 
 
 
सोशल मीडियावर यासंदर्भात एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यात लिहिण्यात आले आहे की, "संबंधित फोटो हा संकलन केलेला  नसून यामध्ये तथ्य आहे. ही एक काँग्रेसची सुनियोजित खेळी आहे. त्यांनी भारताच्या नकाशातून काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशचा काही भाग काढण्यात आल्याचे फोटोच्या माध्यमातून भाकीत केले आहे".
 
 दरम्यान हे फोटो बेळगावातील काँग्रेसच्या संमेलनातील आहेत. बेळगावात झालेल्या काँग्रेसच्या संमेलनात बॅनर लावण्यात आले होते. त्यावेळी त्या बॅनरवर भारताचा अपूर्ण नकाशा दिसत आहे. त्यातून काश्मीर-अरुणाचल प्रदेश ही राज्ये वगळली गेली असल्याने पुन्हा एकदा भारताच्या फाळणीवर काँग्रेस पक्ष टपून असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला.  
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121