रवींद्र वायकर यांची खासदारकी अबाधित

    21-Dec-2024
Total Views | 66
Ravindra Waikar

मुंबई : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार रवींद्र वायकर ( Ravindra Waikar ) यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका गुरुवार, दि. १९ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे रवींद्र वायकर यांची खासदारकी अबाधित राहणार आहे.

लोकसभा निवडणुकीत उबाठा गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा वायकर यांच्याकडून अवघ्या ४८ मतांनी पराभव झाला. “वायकर यांना ४ लाख, ५२ हजार, ६४४ तर कीर्तिकर यांना ४ लाख, ५२ हजार, ५९६ मते मिळाली. मात्र, मतमोजणीत मोठी तफावत आहे,” असा दावा करीत कीर्तिकर यांच्याकडून निकालाला आव्हान देण्यात आले. “मतदानकेंद्रावर मतमोजणीदरम्यान १२० ‘टेंडर’ मते गहाळ झाली असून त्यांची मोजणी झालेली नाही. एकूण ३३३ ‘टेंडर’ मते होती. त्यांपैकी १२० ‘टेंडर’ मते मोजली गेली नाहीत. ‘टेंडर’ मतांच्या फेरमोजणीची विनंती केली होती. पण ती नाकारण्यात आली,” असा दावा कीर्तिकर यांच्यातर्फे करण्यात आला.

मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकार्‍यांकडून अनेक गंभीर चुका झाल्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाला. तसेच, मतमोजणीकेंद्रात मोबाईलचा वापर झाल्याचे दिसून आले. हा मुद्दा वारंवार निदर्शनास आणून देऊन, तसेच गुन्हा नोंदवल्याच्या बाराव्या दिवसापर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याचेही कीर्तिकर यांच्यावतीने न्यायालयाला सांगण्यात आले होते. त्यामुळे, ‘टेंडर’ मते ही या मतदारसंघाच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतील वादाचे मुख्य कारण असल्याचा दावाही कीर्तिकर यांच्यातर्फे करण्यात आला होता.

मात्र, कीर्तिकर यांची याचिका ऐकण्यायोग्य नाही. याचिकेची मांडणी योग्यरित्या करण्यात आलेली नाही. तसेच ‘टेंडर’ मते ही विजयी उमेदवाराला कशी मिळाली, हे दाखविण्यात कीर्तिकर अपयशी ठरले. त्यामुळे त्यांची याचिका फेटाळून लावावी हा वायकर यांच्या वतीने करण्यात करण्यात आलेला दावा न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठाने योग्य ठरवला.

अग्रलेख
जरुर वाचा
राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिदध होतील - काँग्रेस नेते उदित राज यांच्या विधानावर जनतेत संताप

दिल्ली येथे काँगे्रसचे भागीदारी न्याय महासम्मेलन सुरू आहे. या संमेलनामध्ये काँग्रेसचे नेते यांनी राहुल गांधींची तुलना थेट महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली आहे. इतर मागासवर्गिय समाजाने राहुल गांधी यांचे एकावे त्यांना पाठिंबा द्यावा. मागासवर्बिय समाजाने तसे केले तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील असे उदित राज म्हणाले.इतर मागासवर्गिय समाजाला राहुल गांधीच्या समर्थनासाठी आवाहन करताना उदित राज यांनी राहुल गांधींना दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून सिद्ध होतील हे म्हंटले. त्यामुळे समाजात रोष पसरला ..

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर

तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र देण्यामध्ये महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तृतीयंपथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम २०१९ मधील नियम २०२० अंतर्गत विभाग सहा आणि सात नुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र, ओळखपत्र देण्यात येत आहे. तृतीयपंथी नागरिकांना ‘नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन’ या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याची योजना आहे. त्या अंतर्गत. आतापर्यंत राज्यातून ४,४११ ओळखपत्रे दिली आहेत. महाराष्ट्रानंतर दुसरा ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121