'येक नंबर' आता गाजवणार ओटीटी; ZEE5 वर 'या' दिवशी होणार वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर

    07-Nov-2024
Total Views | 25
 
yek number
 
 
 
मुंबई : चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता येक नंबर चित्रपट ओटीटी वाहिनी गाजवण्यास सज्ज झाला आहे. ZEE5 वर ८ नोव्हेंबरपासून 'येक नंबर' अलिकडेच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमिअर होणार अशी घोषणा करण्यात आली आहे. राजेश मापुस्कर दिग्दर्शित चित्रपटात धैर्य घोलप आणि सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. झी स्टुडिओज, नाडियादवाला ग्रँडसन्स एंटरटेनमेंट आणि सह्याद्री फिल्म्स या बॅनरअंतर्गत तेजस्विनी पंडित आणि वरदा नाडियादवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
 
'येक नंबर' चित्रपटाची कथा सधनपूरच्या प्रतापभोवती फिरते. तो राजकारणात करिअर घडवण्याचा प्रयत्न करणारा तरुण आहे. पिंकी या आपल्या बालमैत्रिणीचं मन जिंकण्याचा तो प्रयत्न करत असतो. पिंकी राज ठाकरे यांची चाहती असून त्यांच्या विचारांचा तिच्यावर मोठा पगडा आहे. "तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तू राज साहेबांना गावात आण.", अशी गळ पिंकी प्रतापला घालते. आपले प्रेम साध्य करण्यासाठी प्रताप काय प्रयत्न करतो हे या चित्रपटात पाहायला मिळते.
 
'येक नंबर' चित्रपटात ग्रामीण भागातील रांगडेपणा आणि शहरातील आव्हानं यांची सांगड घालून या चित्रपटात प्रेम, महत्त्वाकांक्षा, राजकीय विचारधारा या भावनांचा शोध घेण्यात आला आहे आणि त्यामुळेच हा चित्रपट मनोरंजन करण्यासोबतच विचार करायलाही भाग पाडतो.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121