आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका विमानाचा हवेतच पेट घेतल्याने अपघात (Plane crash) झाल्यीच दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना ४ नोव्हेंबर रोजी २०२४ रोजी घडली आहे. विमान अपघात होऊन ते विमान शेतात कोसळ्याची घटना आहे. अपघातावेळी विमानातील पायलट आणि अन्य एका व्यक्तीने उडी मारून आपला जीव वाचवला आहे. विमान जमिनीवर पडताच विमानाने पेट घेतला. हा अपघात आग्रा येथील कागरौल भागातील सोंगा गावानजीक एका मोकळ्या शेतात हा अपघात झाला आहे.
दरम्यान या घटनेती माहिती मिळताच प्रशासन आणि सुरक्षा नियंत्रणाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच याचपार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसही घटनास्थळी पोहोचले आहेत. विमान शेतात पडल्याने ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते. अपघातानंतर तात्काळ चौकशीचे आदेश जारी करण्यात आले असून याप्रकरणाची सखोल चौकशी करता यावी यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.
दरम्यान विमानाने पंजाबहून उड्डण घेतले होते. संरक्षण अधिकाऱ्यांच्या हवाल्याचे हे विमान मिग-२९ असल्याचे म्हटले आहे. पंजाबमधील आदमपूर येथून ते उड्डाण केले होते. हे विमान नियमित व्यायामासाठी आग्रा येथे जात होते. अपघधात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू करण्यात आला आहे.