मुंबई : दिग्दर्शक आणि निर्माते विधू विनोद चोप्रा हटके कलाकृतींसाठी कायमच ओळखले जातात. थ्री इडियट्स, परिंदा, मुन्नाभाई एमबीबीएस, सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. नुकताच त्यांचा 12th Fail हा सत्य घटनेवर आधरित चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला देशभरातील प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.
अभिनेता विक्रांत मेस्सीने या चित्रपटात सनदी अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७० कोटींची कमाई करत विक्रम केला होता. आता हा चित्रपट डिझ्नी हॉटस्टावर प्रदर्शित झाला असून डिस्नीवर आत्तापर्यंतच्या शोमध्ये सर्वाधिक व्ह्यूज मिळालेल्या चित्रपटांमध्ये 12th Fail ने बाजी मारली आहे.
12th Fail हा चित्रपट लेखक अनुराग पाठक यांच्या पुस्तकावरुन लिहिला गेला असून आयपीएस अधिकारी मनोज कुमार यांच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. विधु विनोद चोप्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.