मुंबई : महाराष्ट्र राज्य कारागृह विभागांतर्गत अंतर्गत विविध पदांकरिता केली जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांच्या एकूण २५५ जागा भरण्यात येणार आहेत. सदर कारागृह विभागातील रिक्त पदांकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीकरिता शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि वेतन याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
पदाचे नाव -
लिपिक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक आणि अन्य पदे.
शैक्षणिक पात्रता -
मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी
तसेच, पदांच्या आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा -
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता १८ ते ३८ वर्षे
मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता १८ ते ४३ वर्षे
वेतनमान-
१९,९०० ते ६३,२०० रुपये
परीक्षा शुल्क -
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता १ हजार रुपये
मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिता ९०० रुपये
अर्ज स्वीकृतीस दि. ०१ जानेवारी २०२४ पासून सुरूवात
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. २१ जानेवारी २०२४ असेल.