मुंबई : देशातील सर्व रामभक्तांचे लक्ष आता केवळ २२ जानेवारी २०२४ वर केंद्रीत झाले आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. आजवर रामायणाबद्दल आपण विविध माध्यमातील कलाकृतींमधून वाचले, पाहिले आहे. आपल्या देशाला संस्कृचा समृद्ध वारसा लाभला आहे. आणि हिच संस्कृती रामाणातील विविध प्रसंगांमधून देखील आपण कायम शिकत आलो आहोत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक महत्वपुर्ण नाव म्हणजे दादासाहेब फाळके. ज्यांनी भारतातील पहिला बोलपट, मुकपट प्रेक्षकांसमोर आणला. पण तुम्हाला रामायण आणि चित्रपटसृष्टीतील पहिल्या दुहेरी भूमिकेच्या गोष्टीबद्दल माहित आहे का?
अश्मयुगीन काळापासून मनोरंजनाचे विविध प्रकार आपल्याला इतिहासात डोकावल्यास माहित पडतात. नृत्य, चित्र, गीत अशा विविध कलांमधून अनेक पौराणिक कथा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचल्या आहेत. भाषेचा अडसर न येऊ देता चित्र, शिल्प, कोरीव काम अशा विविध कौशल्यांचा वापर करुन रामायण, महाभारत किंवा अन्य पौराणिक कथा आज २१व्या शतकापर्यंत पोहोचल्या आहेत. काळानुरुप मनोरंजनाची माध्यमं उलगडत गेली आणि एका मराठमोळ्या माणसाने चित्रपट या दृकश्राव्य माध्यमाची प्रेक्षकांना ओळख करुन दिली.
दादासाहेब फाळके यांनी १९१७ साली रामायणावर आधारित ‘लंका दहन’ हा पहिला मुकपट प्रदर्शित केला. या मुकपटाची खासियत अशी होती की यात प्रभू रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अण्णा साळूंके यांनी सीता मातेची देखील भूमिका साकारली होती. चित्रपसृष्टीच्या इतिहासातील ही पहिली दुहेरी भूमिका होती.
यानंतर दादासाहेब फाळके यांनीच मराठीतील पहिला बोलपट १९३२ साली प्रदर्शित केला होता ज्याचे नाव होते ‘अयोध्येचा राजा’. या चित्रपटात गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या. रामायणावर आधारित तमिळ, तेलुगू, मल्याळम भाषांमध्ये चित्रपट तयार करण्यात आले होते.