अभिनेते राकेश बेदी यांची ऑनलाईन फसवणूक

    02-Jan-2024
Total Views | 19

rakesh bedi 
 
 
मुंबई : सध्या ऑनलाईन पैशांची फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. सामान्यांपासून अगदी कलाकरांना देखील सायबर गुन्ह्यांचा सामना करावा लागत आहे. श्रीमान श्रीमती’, ‘येस बॉस’, ‘भाभी जी घर पर हैं’ अशा अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकलेले ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांची फसवणूक झाली आहे. गुन्हेगारांनी ऑनलाइन फ्रॉडमध्ये त्यांना ८५ हजार रुपयांचा गंडा घातला असून सैन्यातील अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीने त्यांची फसवणूक केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाइन फ्रॉडमध्ये त्यांनी ८५ हजार रुपये गमावले असून या प्रकरणी त्यांनी ३० डिसेंबर रोजी ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. अहवालातील वृत्तानुसार राकेश बेदी यांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीशी ऑनलाईन ओळख झाली होती. त्याने स्वत:ची ओळख आदित्य कुमार अशी करुन देत एका हाऊसिंग पोर्टलद्वारे पुण्यात एका फ्लॅटची जाहिरात केली होती. बेदी म्हणाले की, “मी त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला कारण मी यापूर्वी माझी एक मालमत्ता डिफेन्स कर्मचार्‍याला विकली होती आणि ती व्यक्ती खरी होती”.
 
संबधित फसवणूकीच्या प्रकरणाबद्दल पोलिसांनी माहिती देत सांगितले की, दोघांत झालेल्या संवादानंतर त्या व्यक्तीने बेदी यांना ५० हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यांनी पैसे दिले, नंतर पैसे परत करण्याबाबत विचारण्यात आले असता आपले अकाउंट लष्कराचे सांगत पैसे ट्रान्सफर केल्याचे दिसत नसल्याचेही सांगितले. मात्र, काही वेळाने आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येण्यापूर्वी राकेश बेदी यांनी २५ हजार व १० हजार असे ३५ हजार त्याच्या खात्यात ट्रान्सफर केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121