आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीनंतर रवींद्र वायकर म्हणतात, "मी बेकायदेशीर..."
05-Aug-2023
Total Views | 52
मुंबई : ठाकरे गटाचे माजी मंत्री रवींद्र वायकर यांची आर्थिक गुन्हे विभागाकडून ५ तास चौकशी करण्यात आली. जोगेश्वरी येथील पंचतारांकित हॉटेल मुंबई महापालिकेच्या राखिव भूखंडावर वायकर यांनी बांधले आहे. त्याची परवानगी वायकर यांनी पालिकेकडून घेतली नव्हती. हा सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा सोमय्या यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. त्याची गंभीर दखल घेऊन आर्थिक गुन्हे शाखेने वायकर यांना चौकशीसाठी बोलावले होते.
५ तासाच्या चौकशीनंतर वायकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "मी कोणतंही बेकायदेशीर कामं केलेलं नाही. माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. मी बाळासाहेबांचा एकनिष्ठ आहे. कायद्याच्या चौकटीत राहुनच हॉटेलचं बांधकाम केलं आहे. माझ्यावर सुडबुध्दीने कारवाई केली आहे." असं वायकर म्हणाले.