"ते सकाळी वेगळं बोलतात आणि संध्याकाळी वेगळं..."; जपानहून येताच फडणवीसांचा बड्या नेत्याला टोला!
26-Aug-2023
Total Views | 66
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानहुन मायदेशी परतताच माध्यमाशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस वर निशाणा साधला. नाना पटोले यांनी म्हटले होते, राज्यात दुषष्काळग्रस्त परिस्थिती असताना नेते गावाला जातात, जपानला जात आहेत. यावर प्रत्त्युत्तर करताना फडणवीस म्हणाले, "नाना पटोलेंना मी कधीच गांभीर्याने घेतलेलं नाही. ते सकाळी वेगळं बोलतात आणि संध्याकाळी वेगळं. मी जपानला गेलो आणि भारताकरता काहीतरी घेऊन आलो. फिरायला गेलो नव्हतो."
जपान दौऱ्याबद्दल सांगताना फडणवीस म्हणाले, "जपानच्या दौऱ्यावरुन आल्यानंतर पुन्हा एकदा मातृभूमीचं दर्शन घेताना प्रसन्न वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ पासून जपानसोबत जे उत्कृष्ट संबंध ठेवले, त्याचा फायदा होत आहे. जपानच्या सरकारने राज्य अतिथी म्हणून निमंत्रित केलं होतं. सरकारी विभाग आणि अनेक कंपन्यांसोबत बैठक झाल्या आहेत, त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल."
"जपानच्या अनेक कंपन्या शिष्टमंडळासह भारतात चर्चेसाठी येणार आहेत. सोनी आणि इतर कंपन्यांनी गुंतवणूक करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. जपानच्या कंपन्यांना चीमध्ये गुंतवणूक करावी वाटत नाही, त्यामुळे त्यांना भारत सेफ वाटत आहे. नवीन भारताच्या क्षमतेवर जपानी कंपन्यांचा मोठा विश्वास आहे. जपानमध्ये माझं मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केलं गेलं. भारतीय दूतावासामध्ये चांद्रयान-३ चं लँडिंग लाईव्ह पाहिलं. तिथल्या भारतीयांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. आपल्या वैज्ञानिकांनी चांगलं काम केलं आहे. त्यासाठी पंतप्रधान इस्रोमध्ये गेले तर काँग्रेसला वाईट वाटण्याची गरज नाही." असं फडणवीस म्हणाले.