देशात औरंग्याचे लाड चालणार नाहीत; नितेश राणेंचा इशारा!
02-Aug-2023
Total Views | 79
मुंबई : देशामध्ये औरंग्याचे लाड चालणार नाहीत अशी स्पष्ट भूमिका आमच्या हिंदुत्ववादी सरकारची आहे. असा इशाराच आ. नितेश राणेंनी दिला आहे. महाराष्ट्रामध्ये काही महिन्यापासून जे हिरवे किडे जे वळवळतायेत. ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. धर्मवीर संभाजी राजेंनी इतिहास घडवला, त्याच महाराष्ट्रामध्ये काही हिरवे कार्टे जिहादी विचाराचे कार्टे हे औरंगजेबाचे स्टेटस ठेवतात. अशा शब्दात राणेंनी सुनावले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार मानताना राणे म्हणाले, "फडणवीसांचे आभार कारण, हे आमच्या लक्षवेधी किंवा प्रश्न विचारण्याच्या अनुसार त्यांनी हे औरंगजेबचे स्टेटस ठेवणारे जे लोक आहेत, त्यांचा मागचा मास्टरमाईंड कोण? या संदर्भात आम्ही चौकशी करू. एटीएस, एसआयटी स्थापन करु. अशा पद्धतीच्या स्टेटस ठेवण्याचा कोण प्रवृत्त करतंय? कोण प्रोत्साहन देतंय? त्यासंबंधीची चौकशी आम्ही करू. असे आश्वासन फडणवीसांनी दिलेले आहे."
"देशाचं संविधान तुम्हाला मान्य नाही आहे का? पाकिस्तान, अफगाणिस्तानच्या शौर्या कायदा तुम्हाला मान्य आहे का? हे त्यांनी उत्तर द्यावं. आणि मग अशा लोकांना गद्दार नाही म्हणायचं. तर कशाला लाड करायची यांची? काय म्हणतात की मी वंदे मातरम म्हणतोच आहे. भारत माता की जय मी म्हणतोच आहे. दुसरा पर्यायच नाही ना? पर्याय काय? नाही म्हणून दाखवावं बघू जीभ राहते का जागेवर?" असा सुचक इशाराचं राणेंनी यावेळी दिला आहे.