भारतीय विद्यार्थिनींची फायनान्‍स व अकाऊंटिंग कोर्सेसना पसंती

संबंधित कोर्सेसमध्‍ये नोंदणी करणाऱ्या विद्यार्थीनींच्‍या संख्‍येमध्‍ये २५ टक्‍क्‍यांची वाढ

    18-Aug-2023
Total Views | 69
Indian Students prefer Finance and Accounting Courses

मुंबई :
फायनान्‍स व अकाऊंटिंगशी संबंधित कोर्सेसमध्‍ये नोंदणी करणाऱ्या विद्यार्थीनींच्‍या संख्‍येमध्‍ये २५ टक्‍क्‍यांची उल्‍लेखनीय वाढ झाली असल्याचे झेल एज्‍युकेशन या भारतातील आघाडीच्‍या फायनान्‍स व अकाऊंट्स एड-टेक व्‍यासपीठाने नुकतेच केलेल्‍या संशोधनामधून निदर्शनास आले. या वाढीचे श्रेय अनेक घटकांना जाते, ज्‍यापैकी सर्वात महत्त्वाचे म्‍हणजे महिलांमध्‍ये आर्थिक साक्षरतेच्‍या महत्त्वाचे वाढते प्रमाण त्‍यांना याच क्षेत्रामधील त्‍यांचे ज्ञान व कौशल्‍ये अधिक निपुण करण्‍यासाठी संधींचा फायदा घेण्‍यास प्रेरित करत आहे. फायनान्स व अकाऊंटिंगमधील कोर्स आणि प्रमाणपत्रांसाठी पुरुष-महिला प्रमाण अंदाजे ६५:३५ आहे. एसीसीए, सीएफए, यूएस सीपीए, सीएमए आणि डिप्‍लोमा इन आयएफआरएस हे पुरूष व महिलांमध्‍ये सर्वाधिक मागणी असलेले टॉप ५ कोर्सेस आहेत.

या विषयांमध्‍ये ज्ञान प्राप्‍त करण्‍याचा नवीन उत्‍साह आणि एडटेक व्‍यासपीठांनी प्रदान केलेल्‍या सोयीसुविधा व स्थिरता यांनी अधिकाधिक विद्यार्थीनींचे लक्ष वेधून घेण्यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. झेल एज्‍युकेशनने नुकतेच केलेल्‍या संशोधनामधून विद्यार्थीनींच्‍या नोंदणीमध्‍ये उल्‍लेखनीय वाढ दिसून आली, जी २०२१ मधील १५ टक्‍क्‍यांच्‍या माफक वाढीच्‍या तुलनेत उल्‍लेखनीय ४३ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचली. तसेच २०२२ मध्‍ये फायनान्‍स व अकाऊंटिंग कोर्सेससाठी मागणीमध्‍ये ४० टक्‍क्‍यांची लक्षणीय वाढ झाली. व्‍यक्‍तींना प्रेरित करणाऱ्या पारंपारिक घटकांव्‍यतिरिक्‍त जागतिक आर्थिक क्षेत्रातील अस्थिरतेने महिलांमध्‍ये आर्थिक अनिश्चिततांचा सामना करण्‍यासाठी कौशल्‍ये विकसित करण्‍याच्‍या आवश्‍यकतेबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे.

विद्यार्थीनींच्‍या भौगोलिक विभाजनासंदर्भात ७५ टक्‍के विद्यार्थीनी महानगरीय शहरांमधून आहेत, तर उर्वरित २५ टक्‍के विद्यार्थीनी द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या शहरांमधून आहेत. सामान्‍यत: महानगरीय प्रांतांमध्‍ये शैक्षणिक संस्‍थांचे उच्‍च प्रमाण दिसून येते, ज्‍यामध्‍ये प्रतिष्ठित युनिव्‍हर्सिटीज, महाविद्यालये व व्‍यावसायिक प्रशिक्षण केंद्रांचा समावेश आहे. पण, उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे लहान नगर व शहरांमधील विद्यार्थीनींचे प्रमाण सर्वाधिक आहे, जे एकूण विद्यार्थ्‍यांमध्‍ये २५ टक्‍के आहे. यामधून विद्यार्थीनींमध्‍ये वाढती रूची आणि लहान शहरी केंद्रांमध्‍ये उपलब्‍ध असलेले दर्जेदार शिक्षण दिसून येते. सुधारित शैक्षणिक सुविधा, मोठ्या प्रमाणात करिअरबाबत जागरूकता आणि ऑनलाइन अध्‍ययन व्‍यासपीठांची उपलब्‍धता अशा विविध योगदानदायी घटकांमधून हा ट्रेण्‍ड स्‍पष्‍ट होऊ शकतो.

झेल एज्‍युकेशनचे संचालक व सह-संस्‍थापक अनंत बेंगानी म्‍हणाले, "लैंगिक तफावत दूर करण्‍याच्‍या दृष्टीकोनाने अखेर आम्‍हाला काही प्रबळ ट्रेण्‍ड्स स्‍थापित करण्‍यास मदत केली आहे. आर्थिक साक्षरतेबाबत जागरूकतेमध्‍ये वाढ होत असताना अधिकाधिक विद्यार्थीनी आता त्‍यांचे करिअर व भविष्‍याकडे बारकाईने लक्ष देत आहेत. पारंपारिक पुरूष-प्रधान शैक्षणिक क्षेत्रांमध्‍ये, तसेच उद्योगांमध्‍ये अधिकाधिक विद्यार्थीनी आपले करिअर घडवत असल्‍याचे पाहून आनंद होत आहे. आर्थिक अनिश्चितता, बाजारपेठेतील अस्थिरता आणि आर्थिक संकटांच्या एकूण शक्यता शैक्षणिक मागणीला चालना देत राहतील. आम्ही आगामी वर्षात या कोर्सेससाठी जवळपास ३५ टक्के वाढ होण्‍याची अपेक्षा करत आहोत."

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121