मुंबई : शिवसेना पॉडकास्टमध्ये खासदार संजय राऊतांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत उबाठा गटाचे सचिव आदेश बांदेकर यांनी राऊतांची ही मुलाखत घेतली आहे. आर्थर रोड जेलमध्ये मतदान घेतलं असतं तर असा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला. यावर, मतदान घेतले असते तर ९० टक्के मते शिवसेनेला मिळाली असती. असं राऊत म्हणाले.
"जिथं कसाब होता तिथेच मी होतो. आर्थर रोड जेलमध्ये मतदान घेतले असते तर ९० टक्के मते शिवसेनेला मिळाली असती. हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो. त्या तुरुंगात साडे आठ हजार लोकं होते. किमान ८ हजार मतं त्या परिस्थितीत शिवसेनेलाच मिळाली असती. तिथे माझं पक्षाचच काम चालु होतं. शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. लोकांच्या संघर्षासाठी जन्माला आली. शिवसेना विझली तर महाराष्ट्रातील आग संपेल." असा दावा संजय राऊतांनी केला आहे.