नवी दिल्ली : आज अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहे. ते म्हणाले की, सत्ताधारी गेल्या तीन दिवस लोकसभेत विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत आहेत. लोकसभेत ते म्हणाले की, ही आमची नाही, तर ही विरोधकांची फ्लोर टेस्ट आहे आणि आम्ही २०२४ मध्ये परत निवडूण येऊ. देव खूप दयाळू आहे आणि कोणत्या तरी माध्यमातून बोलतो...विरोधकांनी हा ठराव आणला हा देवाचा आशीर्वाद आहे असे मला वाटते. २०१८ च्या अविश्वास प्रस्तावादरम्यान मी म्हणालो होतो की ही आमच्यासाठी फ्लोअर टेस्ट नव्हती तर त्यांच्यासाठी फ्लोर टेस्ट होती आणि परिणामी ते निवडणूक हरले.अविश्वास प्रस्तावावरील सर्व सदस्यांचे विचार मला कळले. जनतेचा सरकारवर पुर्ण विश्वास आहे.त्यामुळे कोटी -कोटी नागरीकांचा मी आभारी आहे.
दरम्यान काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधानांवर टीका केली. त्यामुळे संसदेत चांगलाच गदारोळ झाला. भाजप सदस्यांच्या आक्षेपानंतर काही शब्द रेकॉर्डमधून काढून टाकण्यात आले. यानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बोलण्यास सुरुवात केली तेव्हा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मणिपूर, शेम अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.सिंधिया बोलत असताना सोनिया गांधींसह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सभागृहातून वॉकआउट केले. मात्र, काही वेळाने सर्वजण परतले. सिंधिया टोमणे मारत म्हणाले, 'विरोधकांना देशाची चिंता नाही. पंतप्रधानपदाची चिंता नाही, राष्ट्रपतीपदाची चिंता नाही. त्यांना फक्त त्यांच्या स्थितीची काळजी आहे. मी या सदनात २० वर्षापासून आहे. पण मी असे दृश्य पाहिले नाही. पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी भाजपने मोदींच्या भाषणाचा जुना व्हिडिओ ट्विटरवर जारी केला. त्यात मोदी म्हणतात, 'मी कुणाला सोडणार नाही. तू काळजी करू नकोस मी सर्वांचा आदर करीन, तुम्ही काळजी करू नका.
अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ५ वाजता लोकसभेत पोहोचले. पंतप्रधान मोदींसोबत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशीही उपस्थित होते. पीएम मोदी स्पीकरला अभिवादन करून त्यांच्या आसनावर बसले. पंतप्रधान मोदी सभागृहात पोहोचले, त्यावेळी आसाममधील भाजप खासदार बोलत होते.