ज्योतिरादित्य सिंधियांचं भाषण विरोधकांना झोंबलं; दुटप्पीपणाची पोलखोल होताच केला सभात्याग
10-Aug-2023
Total Views | 132
नवी दिल्ली : अविश्वास प्रस्तावावर संसदेत बोलताना ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "विरोधकांना देशाची चिंता नाही, पंतप्रधानपदाच्या गरिमेची चिंता नाही, राष्ट्रपतीपदाची चिंता नाही. त्यांना फक्त राजकारण करायच आहे. मी या संसदेत 20 वर्षांपासून खासदार आहे. पण असे दृश्य मी कधीच पाहिले नाही".
काँग्रेसचे गटनेत अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अपशब्द वापरले. त्यावरही ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसने देशाची माफी मागावी, अशी मागणी केली. त्याचवेळी ज्योतिरादित्य सिंधिया संसदेत बोलत असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. स्वत:च्या अविश्वास प्रस्तावावर विश्वास नसल्याची टीका ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विरोधकांवर केली.
मणिपूर हिंसाचारावर बोलताना ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, "२०११ मध्ये जेव्हा मणिपूरमध्ये 100 दिवसांपेक्षा जास्त काळ नाकाबंदी चालली होती, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग गप्प का होते? हे कसले राजकारण? त्यांचा संधिसाधू विचार मला संपूर्ण देशातील जनतेसमोर उघड करायचा आहे. जे नीतिमत्तेच्या, तत्त्वाच्या गप्पा मारतात, ते सर्वाधिक भ्रष्ट असलेल्या पक्षाशी हातमिळवणी करतात".