मुंबई : राज्यात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, पालघर, नाशिक, यवतमाळ आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मरीन लाईन्स येथे चर्चगेट दरम्यान साचलेले पाणी पंपाद्वारे उपसण्यास सुरुवात केली आहे. अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. चर्चगेटजवळ रेल्वे परिसरात पाणी साचलं आहे. रेल्वे रुळांवरच पाणी रस्त्यावर आल्याने सखल भागात पाणी साचलं आहे.
मध्य रेल्वेवर पावसाचा परिणाम झाल्याचे दिसते आहे. मध्य रेल्वे १२ मिनीट उशिरा धावत आहे. मुंबईत अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा परिणाम मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर झाला आहे. दोन्हीही मार्गांवरील वाहतुक सध्या धिम्या गतीने सुरु आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतुक सध्या 20 मिनिटांनी उशारानं सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मरीन लाईन्स येथे चर्चगेट दरम्यान साचलेले पाणी पंपाद्वारे उपसले
खार सबवे पाण्याखाली
वसई, विरार, नालासोपाऱ्यात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. तर अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. पालघर जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अंधेरी , खार, मालाड, कांदिवली बोरिवली इथेही पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. अंधेरी सबवे, खार सबवे पाण्याखाली गेला आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
नभ उतरू आलं...
मुसळधार पावसाने सर्वत्र धुक्याची चादर ओढल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता दिसत नसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
घोडबंदर पाण्याखाली...
सकाळी पासून ठाण्यात पावसाची संततधार सुरू असतानाच दुपारचा सुमारास अचानक पावसाचा जोर वाढला आहे. मागील 5 तासात ठाण्यात 45 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मागील तास भरमध्ये 25 मिलिमीटर पाऊस पडल्यामुळे शहरातील वंदना सिनेमा, राम मारुती रोड, घोडबंदर रस्ता, बाजार पेठ या ठिकाणी पणी साचलं आहे. त्यामुळे एसटीचा बसेस बरोबर रिक्षा चालक आणि दुचाकी स्वर यांना देखील त्यातून वाट काढावी लागत आहे.