महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात सुरू होणार विमानतळांची कामे! फडणवीसांची घोषणा

    21-Jul-2023
Total Views | 192
 
Devendra Fadnavis
 
 
मुंबई : राज्यात विमानतळ सुरु करण्याच्या योजनांची माहीती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळ अधिवेशनात दिली आहे. मुंबईतील विमानतळाला दोन धावपट्ट्या असल्या तरी एकावेळी एकच धावपट्टी वापरता येते. त्यामुळे विमान उड्डाणांवर मर्यादा येत असते. त्यामुळे नवीमुंबईतील विमानतळाचा प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला होता. आता नवीमुंबईच्या विमानतळाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. धावपट्ट्या देखील तयार करण्यात आल्या आहेत. त्याचे फायनल कोटींग लवकरच होईल आणि टर्मिनलचे कामही अंतिम टप्प्यात असून ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होईल असे प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी सांगितले.
 
राज्याच्या मध्यवर्ती भागात मोठ्या एअरपोर्टची गरज असून कराड शहरात जमीन संपादन करण्यासाठी पुन्हा जोमाने प्रक्रिया राबविण्याची घोषणा फडणवीसांनी यावेळी केली. "काही वर्षांपूर्वी कोल्हापूरला मोठा पूर आला होता. त्यावेळी पुरामुळे कोल्हापूरचा एअरपोर्ट वापरता येत नव्हता. त्यामुळे कराड सारख्या मध्यवर्ती भागात मोठ्या विमानतळाची गरज निर्माण झाली. परंतू तेथील लोक जमिन देण्यास विरोध करीत आहेत." हा प्रश्न लवकरच सोडविण्यात येणार असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी सांगितले.
 
मुंबई विमानतळाकडे दुपारचा टाईम स्लॉट उपलब्ध नसल्याने रिजनल कनेक्टीविटी साठी अडचणी येत आहेत. तसेच संभाजीनगरातील विमानतळासाठी जमीन संपादनासाठी 800 कोटी मंजूर झाले आहेत. त्यामुळे संभाजीनगरात मोठी विमाने उतरविणे सोपे होणार आहे. अकोला धावपट्टीसाठी लांबीसाठी जमिन मिळाली, परंतू रुंदीसाठी जमिन कमी पडली आहे. त्यामुळे आणखी जमिन संपादन करावे लागणार आहे. असं फडणवीस यांनी सांगितले.
 
नांदेड विमानतळासाठी सरकार पैसे द्यायला तयार आहे. रिलायन्सकडून ते नंतर वसुल करण्यात येतील. परंतू नांदेडला नाईट लॅण्डींगची सुविधेसह काम व्हावे अशी योजना आहे. परंतू मुंबई विमानतळाकडे दिवसाचा स्लॉट नसल्याने अडचणी आहेत. एका नांदेडला नाईट लॅण्डींग सुविधा झाली की रिजनल कनेक्टीविटी होऊन विमानतळ फायद्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील काही विमानतळ एमआयडीसी तर काही अन्य एजन्सीकडे असल्याने सर्वांसाठी एकच नोडल एजन्सी तयार करण्यासाठी मुख्यमंत्र्याशी बैठक केली जाईल असेही त्यांनी सांगितले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121