मुंबई : मणिपूरमधील महिलांची विवस्त्र धिंड काढल्याच्या व्हायरल व्हिडिओनंतर सुप्रीम कोर्टाने सरकारवर टीका केली होती. मात्र, आता भाजपाकडुन कोर्टाला चोख प्रत्त्युत्तर देण्यात आलं आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. सरकारचं काम सुप्रीम कोर्ट करणार असेल तर सुप्रीम कोर्टानंच देश चालवावा. असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.
अतुल भातखळकर म्हणाले, "सरकारचं काम सुप्रीम कोर्ट करणार असेल तर सुप्रीम कोर्टानंच देश चालवावा. मग कशाला हव्यात निवडणुका आणि संसद? खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल." अशा शब्दांत भातखळकरांनी सुप्रीम कोर्टाला फटकारलं आहे.