मूर्ती दाम्पत्यांकडून तिरुपती बालाजी मंदिरास देणगी; दिले इतके....!
18-Jul-2023
Total Views | 249
मुंबई : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी सपत्नीक तिरुपती बालाजी देवस्थानाला भेट दिली आहे. यावेळी नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी लेखिका सुधा मूर्ती यांनी यावेळी मंदिर देवस्थानाला एक सोन्याचा 'अभिषेक शंख' आणि 'कासव' दान केला आहे. दरम्यान, हा सोन्याचा अभिषेक शंख आणि सोन्याचा कासव या दोन्ही वस्तू २ किलोचा असून त्यांची किंमत २ कोटीहून अधिक आहे. दरम्यान, मूर्ती दाम्पत्यांनी दान केलेल्या दानाला 'भूरी' दान असेही म्हणतात.
इन्फोसिस संस्थापक सदस्य नारायण मूर्ती यांनी याआधी देखील तिरुपती बालाजी देवस्थानास देणग्या दिल्या असून आता पुन्हा एकदा त्यांनी सोन्याच्या वस्तू देणगी स्वरुपात मंदिर देवस्थानास दान केल्या आहेत. दरम्यान, नारायण मूर्ती यांच्या पत्नी लेखिका सुधा मूर्ती या तिरुपती बालाजी देवस्थानाच्या सदस्यपदी राहिलेल्या आहेत.
दरम्यान, तिरुपती बालाजी मंदिरास देशभरातून असंख्य पर्यटक भेट देत असतात. तिरुपती बालाजी मंदिर देवस्थान देशातील सर्वाधिक श्रीमंत असे देवस्थान आहे. भगवान व्यंकटेश भाविकांची मनोकामना पूर्ण करत असल्याची लोकांची श्रध्दा आहे. या श्रध्देमुळेच भाविकांचा ओढा या देवस्थानाकडे असतो.