अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’ सेन्सॉरच्या कचाट्यात

    13-Jul-2023
Total Views | 77
 
omg 2 (2)


मुंबई :
अभिनेता अक्षय कुमार याचा प्रमुख भूमिका असलेला 'ओएमजी २' चित्रपट अडचणीत आला आहे. नुकताच त्याचा या चित्रपटातील भोलेनाथ यांच्या रुपातला लूक समोर आला होता. यावेळी नेटकऱ्यांनी आदिपुरुष चित्रपटामुळे दुखावल्या गेलेल्या हिंदुंच्या भावना यांचा उल्लेख करत या चित्रपटाकडूनही ही चुक होऊ नये अशी तंबी दिली होतीच. यानंतर आता 'ओएमजी २' चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला आहे. चित्रपटातील एका सीनवरुन आक्षेप घेण्यात आला आहे. रेल्वेच्या पाण्याने भोलेनाथला अभिषेक केल्याचे या सीनमध्ये दाखवले आहे. यावरच आपत्ती दर्शवत सेन्सॉर बोर्डाने यावेळी विशेष काळजी घेत अहवाल सुधारित समितीकडे पाठवला आहे.
 
'आदिपुरुष' चित्रपटामुळे उभ्या राहीलेल्या वादंगामुळे सध्या सेन्सॉर बॉर्ड अतिदक्षता घेताना दिसत आहे. धर्माबद्दल प्रेक्षकांच्या भावना दुखावू नये यासाठी विशेष काळजी सेन्सॉरकडून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, 'ओह माय गॉड २' चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याआधी त्याचा अहवाल सुधारित समितीकडे पाठवला आहे. चित्रपटातील संवाद आणि काही सीन्सवरुन वादंग निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. देव आणि धर्माशी निगडित विषय असल्याने हा अहवाल सेन्सॉर बोर्डाकडून सुधारित समितीकडे पाठवण्यात आला आहे. यावर कमिटी लवकरच निर्णय घेईल.
 
नुकतेच चित्रपटात वकिलाची भूमिका साकारणाऱ्या यामी गौतमचे पोस्टरही प्रदर्शित झाले आहे. उमेश शुक्ला दिग्दर्शित ओ माय गॉड या २०१२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा हा दुसरा भाग असून 'ओएमजी २' चे दिग्दर्शन अमित राय यांनी केले आहे. यात पहिल्यांदाच अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी एकत्र काम करणार आहेत. पहिल्या भागात अक्षयने भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती. यामध्ये तो भगवान शंकराच्या भूमिकेत दिसणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121