दै. ‘मुंबई तरुण भारत’चे ‘माझे शहर लव्ह जिहाद मुक्त शहर’ अभियान
स्वधर्म अभिमानाची ज्योत पेटवा
09-Jun-2023
Total Views | 53
नगर : “पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची पावन जन्मभूमी असलेल्या या जिल्ह्यात औरंग्याला बाप मानणार्या अवलादी आहेत ही अतिशय संतापजनक बाब आहे. या प्रवृत्ती आपल्या धर्म संस्कृतीवर प्रहार करत असून त्यांच्यांविरोधात एकत्र येत स्वधर्म अभिमानाची ज्योत पुन्हा पेटवू या,” असे कळकळीचे आवाहन योगिता साळवी यांनी केले. अखंड हिंदू समाजतर्फे जिल्ह्यातील कर्जतच्या मुख्य चौकात ‘माझे शहर लव्ह जिहादमुक्त शहर’ सभेचे आयोजन बुधवार, दि. ७ जून रोजी करण्यात आले होते. त्यावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या उपसंपादिका योगिता साळवी यांनी ‘लव्ह जिहाद’च्या घटनांचा तीव्र निषेध व्यक्त करत त्या मागचे षड्यंत्र उदाहरणांसह आपल्या भाषणातून सांगितले.
साळवी म्हणाल्या, “पुण्यश्लोक अहिल्यामाता या नगरच्या सुकन्या, त्यांनी केलेल्या देदीप्यमान कर्तृत्वपुढे सारे जग नतमस्तक आहे, त्याच मातेच्या या जन्मस्थळी आपल्या लेकीबाळी सातत्याने ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. या विरोधात आपण सर्वांनी पेटून उठण्याची गरज आहे. “ ‘लव्ह जिहाद’ची कारणे, स्वधर्म अभिमानाची ज्योत पेटवा दुष्परिणाम तसेच ‘लव्ह जिहाद’चा धोका कसा टाळू शकतो,” यावर त्यांनी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त करत अनेक उदाहरणे दिली. त्या म्हणाल्या, “जर आंतरधार्मीय विवाह झाला आणि दुर्दैवाने संबंधित विवाहातील दाम्पत्यांना विवाहामुळे काही त्रास असेल, तर आंतरधार्मीय परिवार विवाह समनव्य समिती त्यांना योग्य पद्धतीने मदत करू शकते. त्यासाठी पीडितांना पुढे येणे गरजेचे आहे.
‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा होणे काळाची गरज असल्याचे सांगून त्याचे महत्त्वही त्यांनी पटवून दिले. यावेळी उपस्थित शेकडो ग्रामस्थांनी राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा व्हायलाच पाहिजे, अशी एकमुखी मागणी केली.
‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा’मंजूर होईलच...
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महिला बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा हे अत्यंत संवेदनशील असल्याने ते राज्यातील मुलींच्या आणि मुख्यत्वे धर्मसंस्कृतीच्या रक्षणासाठी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा राज्यात जरूर मंजूर करतील, असा आशावाद नगरच्या रहिवाशांनी व्यक्त केला.