आशिष देशमुख गडकरींच्या भेटीला, 'या' दिवशी करणार भाजपात प्रवेश!
17-Jun-2023
Total Views | 108
मुंबई : काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दि. १७ जून रोजी भेट घेतली. यानंतर देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधताना दि. १८ जून रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. गडकरी यांच्या नागपूरच्या निवासस्थानी आशिष देशमुख यांनी ही भेट घेतली. पक्षाविरोधी भूमिकेचा ठपका ठेवत आशिष देशमुख यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली होती.
देशमुख म्हणाले, "भाजपात हा माझा पुन्हा प्रवेश आहे. सातत्याने माझ्या राजकीय वाटचालीमध्ये महत्त्वाची भुमिका गडकरीसाहेब बजावत आले आहेत. माझ्यासाठी ते पितृतुल्य आहे. त्यांचा आशिर्वाद हा सदैव माझ्या पाठीशी आहे. त्यांच्या आशिर्वादामुळे येणाऱ्या पुढच्या संपुर्ण राजकीय वाटचालीत मी यशस्वी होईन अशी मला खात्री आहे."