आदिपुरुषवर तरण आदर्शचा एका शब्दात रिव्ह्यू, म्हणाला "अर्धा..."

    16-Jun-2023
Total Views | 2009
Film Critic And Trade Analyst Taran Adarsh

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित "आदिपुरुष" हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाच्या यशाबद्दल सिने समीक्षक तरण आदर्श यांनी आपले मत मांडले आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया फक्त एका शब्दात दिली असून ते म्हणाले, निराशामय केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या चित्रपटाला त्यांनी अर्धा रेटिंग दिला असून दरम्यान तरण आदर्श यांनी ट्विटर केलेली पोस्ट सध्या चर्चेत असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, आदिपुरुष ही एक निराशा करणारा आहे, तसेच हा चित्रपट फक्त अपेक्षा पूर्ण करत नाही तर दिग्दर्शक ओम राऊत यांच्याकडे फक्त कलाकार नसून प्रचंड बजेटसुध्दा होते, पण एक या चित्रपटाच्या मांडणीत त्यांनी गोंधळ निर्माण केल्याचे त्यांनी आपल्या रिव्ह्यूमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, 'आदिपुरुष' हा चित्रपट हिंदू महाकाव्य रामायणावर आधारित असून सीतेच्या जन्मस्थानाविषयी परस्परविरोधी दावे आहेत, काही आवृत्त्यांमध्ये असे म्हटले आहे, की देवीचा जन्म सध्याच्या भारतातील सीतामढी येथे झाला होता, तर काहीजण म्हणतात की तिचा जन्म सध्याच्या नेपाळमधील जनकपूर येथे झाला होता.

आतापर्यंत सर्वांना माहित आहे की ही कथा 'रामायण' या महाकाव्यावर आधारित आहे आणि दिग्दर्शक ओम राऊत यांनी पटकथा लिहिली आहे जी संपूर्ण चित्रपटात सातत्याने गोंधळलेली आहे. कथेवर काम करणे हे प्रत्येक भारतीयात इतके भावनिक आहे की, निर्मात्यांनी योग्य कथा चुकीच्या पद्धतीने सांगण्याचा धोका पत्करला, असे चित्रपट जाणकारांचे मत आहे. तसेच, काहींनी या चित्रपटावर म्हटले आहे की, चित्रपट पाहिल्यानंतर, मी आता पुष्टी करू शकतो की निकाल म्हणजे 'उदासीन' सत्याशिवाय दुसरे काहीही नाही.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121