मुंबई : आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडेंसोबत अभिनेता शाहरुख खान यालाही आरोपी करण्यात यावे यासाठी ऍडव्होकेट निलेश ओझा यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. १२ जून रोजी ओझा यांनी शाहरुख खान विरोधातील ही याचिका कोर्टात दाखल केली आहे. त्यामुळे लवकरच याप्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता आहे. या याचिकेमुळे आता शाहरुख खानच्या पुन्हा एकदा अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
"समीर वानखेडे प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अभिनेता शाहरुख खान याने 50 लाख रुपये लाच दिल्याचं म्हटलं आहे. लाच प्रतिबंधक कायद्यानुसार लाच मागणारा आणि लाच देणारा हे दोघेही दोषी असतात. शाहरुख खान याने लाच दिली आहे. यामुळे शाहरुखलाही आरोपी करावं." अशी याचिका ऍडव्होकेट निलेश ओझा यांनी केली आहे.