मीरारोड हत्याकांड : सरस्वतीची हत्या केल्यानंतर तिचे फोटो काढून...
12-Jun-2023
Total Views | 1038
मुंबई : मीरारोडमध्ये 'लिव्ह-इन पार्टनर' खून प्रकरणात अनेक नवे खुलासे उघडकीस येत आहेत. सरस्वती वैद्य यांचे तुकडे करून कुकरमध्ये उकळणारा आरोपी मनोज साने याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, हत्येनंतर मृतदेहाची दुर्गंधी येऊ नये यासाठी गुगलवरून उपाय शोधला होता. तसेच साने याने खून केल्यानंतर मृतदेहाचे फोटो काढल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची हे जाणून घेण्यासाठी साने यांनी अनेक गुगल सर्चही केले. चौकशीदरम्यान साने हे वारंवार आपले म्हणणे बदलत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी त्याच्या अनेक जबाबांची उलटतपासणीही केली.
दरम्यान अनाथ असलेल्या सरस्वतीच्या तीन बहिणी असल्याची माहिती ही समोर आली आहे. त्या तिघांनीही पोलिसांसमोर जबाब नोंदवला. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी मनोज सानेला कठोर शिक्षा व्हावी यासाठी ते पोलिसांकडे खटला भरण्याचे आवाहन करत आहेत. तसेच सरस्वती वैद्य यांची बहीण आरोपीने काढलेले तिचे लांब केसांचे छायाचित्र पोलिसांसमोर पाहून भावूक झाले. साने यांनी सरस्वतीचे केस कापून त्यांच्या फ्लॅटच्या किचन प्लॅटफॉर्मवर ठेवले होते. वसई-विरार पोलिसांनी सांगितले की, सरस्वतीला तिचे लांब केस आवडतात असे बहिणीने सांगितले.
तसेच साने यांनी सरस्वतीच्या शरीराचे कटरच्या साहय्याने तुकडे केले. त्यानंतर आरोपींनी गुगल सर्च करून शरीराच्या तुकड्यांमधून दुर्गंधी येऊ नये म्हणून काय केले पाहिजे याची माहिती गोळा केली. यानंतर त्यांनी त्यांच्या परिसरातील एका दुकानातून निलगिरी तेलाच्या पाच बाटल्या आणून मृतदेहावर शिंपडल्या.