मुंबई :WHO ला मी एक पत्र पाठवणार आहे. त्यांनी संजय राऊतच्या जिभेचे संशोधन करावं, अशी त्यांना विनंती करणार आहे. एखादी व्यक्ती 24 तास कशी चाटुगिरी करू शकते याचा अभ्यास करावा, असं त्यांना सुचवणार आहे, असं आ. नितेश राणे म्हणाले आहेत. यावेळी राणेंनी खासदार संजय राऊत, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
नितेश राणे म्हणाले, "WHO ला मी एक पत्र पाठवणार आहे. त्यांनी संजय राऊतच्या जिभेचे संशोधन करावं, अशी त्यांना विनंती करणार आहे. एखादी व्यक्ती 24 तास कशी चाटुगिरी करू शकते याचा अभ्यास करावा, असं त्यांना सुचवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्यापेक्षा तुझ्या जिभेचं काहीतरी कर. तुझी जीभ म्युझियममध्ये ठेवण्याच्या लायकीची झाली आहे." असं नितेश राणे म्हणाले आहेत.