साधं २६ जुलैचा पूर आला तेव्हा बाळासाहेबांना टाकून वांद्र्यात लपून बसले!
बाबरीच्या ढाँच्यावरुन सुरू केलेल्या राजकारणावर उद्धव ठाकरेंना नितेश राणेंचा टोला
11-Apr-2023
Total Views | 172
29
मुंबई : बाबरीचा वादग्रस्त ढाचा पाडण्यात शिवसैनिकांचा सहभाग होता, असा दावा उध्दव ठाकरे वारंवार करत आहेत. यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी, "बाबरी ढाचा पाडत असताना उध्दव ठाकरेंच नेमक योगदान काय? ढाचा पाडताना उध्दव ठाकरे कोणत्या बिळात लपुन बसले होते? असा सवाल केला आहे.
नितेश राणे म्हणाले, "बाळासाहेबांच रामजन्म भुमीबद्दल योगदान हे मोठचं आहे. पण उध्दव ठाकरे वारंवार बाळासाहेबांच्या योगदानाबद्दल बोलत आहेत. कधीतरी त्यांनी स्वतःच ही यागदान सांगावं. त्यावेळी मातोश्रीच्या कोणत्या बिळात तुम्ही लपले होतात? कोणता कॅमेरा साफ करत बसलेलात? बाबरी ढाचा पाडत असताना उध्दव ठाकरेंच नेमक योगदान काय? याबद्दल महाराष्ट्राला कधीतरी माहिती द्या."
"२६/७ ला मुंबई तुंबलेली तेव्हा बाळासाहेबांना एकट टाकुन उध्दव ठाकरे वांद्रयात ताज प्रेसिडेंट मध्ये लपलेले. आणि बाबरीबद्दल ची भाषा करताय. कधीतरी महाराष्ट्राला कळु दे, की उध्दव ठाकरे हा किती घाबरट माणुस आहे. त्यामुळे यानंतर बाळासाहेबांच्या योगदानाबद्दल बोलण्या आधी स्वत-च योगदान सांगा." असा थेट इशारात राणेंनी ठाकरेंना दिला आहे.