रत्नागिरी : ठाकरे शिवसेनेच्या लांजा शहरप्रमुख पदावरून गुरुप्रसाद देसाई यांना हटविल्याची माहिती उबाठा गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. या पदावर आता नागेश कुरूप यांची निवड करण्यात आली आहे. उबाठा गटाच्या लांजा शहरप्रमुख पदावरून गुरुप्रसाद देसाई यांना हटवले आहे. आता नवे शहरप्रमुख म्हणून नागेश कुरूप यांची निवड झाली आहे.
संघटनात्मक कौशल्य असलेले नूतन शहर प्रमुख नागेश कुरूप यांना हे पद देण्यात आले आहे. या प्रकरणात संपूर्ण राज्यात शिवसेनेत पक्षात फूट पडल्यानंतर याचे पडसाद ग्रामीण भागात पोहोचले. लांज्यातील नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. हा उबाठा गटाला जोरदार धक्का मानला जात होता. तेव्हापासूनच शहर प्रमुख गुरुप्रसाद देसाई यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली.
गुरुप्रसाद देसाई यांना न हटवल्याने उबाठा गटात नाराजी दिसून येत होती. खुद्द खासदार विनायक राऊत हेही देसाई यांचा राजीनामा घेण्यासाठी आग्रही होते. अखेर शिवसेना शहर प्रमुख पदावरून गुरुप्रसाद देसाई यांना हटवण्यात आले आहे.