शिवसेना आणि धनुष्यबाणावर शिंदेंचाच हक्क

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे राजकीय वर्तुळातूनही स्वागत

    18-Feb-2023
Total Views | 96
 
ShivSena
 
मुंबई : ‘शिवसेना’ पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच हक्क असल्याचा ऐतिहासिक निर्णय शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राजकीय वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
 
सत्यमेव जयते
 
शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांचीच आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. हा लोकशाहीचा सर्वांत मोठा विजय आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी वारसा चालवणारी शिवसेना आणि भाजप युती महाराष्ट्राला नव्या उंचीवर नेईल. सत्यमेव जयते.
 
- चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप
 
 
राजकारणात स्वच्छता पर्वाला सुरुवात
 
केवळ घराणेशाहीच्या जोरावर भारतीय लोकशाहीतील राजकीय पक्ष ताब्यात ठेवता येणार नाहीत, असा हा स्पष्ट संकेत निवडणूक आयोगाने दिला आहे. पक्षांतर्गत लोकशाही बळकट करणारा हा निर्णय भारताच्या लोकशाहीला बळकटी देणारा आहे. या निर्णयामुळे भारतीय राजकारणातील एका मोठ्या स्वच्छता पर्वाला सुरुवात झाली आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही.
 
- सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री, महाराष्ट्र
 
 
शिंदे आणि सहकारी बाळासाहेबांचावैचारिक वारसा पुढे नेतील
 
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांना शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय स्वागतार्ह आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचे ’शिवधनुष्य’ मुख्यमंत्री शिंदे व त्यांचे सर्व सहकारी यशस्वीरित्या पेलतील, असा मला विश्वास आहे.
 
- विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस, भाजप
 
 
हा शिवसैनिकांना मिळालेला पुरस्कार
 
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या निर्णयाच्या औचित्यावर मी शिवसैनिकांचे मनापासून अभिनंदन करतो. आजवर निवडणूक आयोग आणि न्यायालयाकडून उद्धव ठाकरेंना इतक्या वेळा फटकार बसली आहे की आता त्यांच्या गालावर फटकारे खाण्यासाठी जागाही शिल्लक राहिलेली नाही. शिवसैनिकांनी आजवर शिवसेना वाढविण्यासाठी केलेल्या काबाडकष्टांचे आज चीज झाले आहे. स्वतःच्या आणि कुटुंबाच्या नावावर शिवसेना आणि पक्ष ठेवणार्‍यांना या निर्णयातून मोठी चपराक मिळाली आहे. घाम गाळणार्‍या शिवसैनिकांना मिळालेले पक्षाचे नाव आणि चिन्ह हा सर्वसामान्य शिवसैनिकांना मिळालेला पुरस्कार आहे.
 
- नारायण राणे, केंद्रीय मंत्री
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121