मुंबई: चार राज्यातील निवडणुकीचे आकडे समोर आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सर्वात आधी "एक्सिट पोल ओपिनियन पोल बंद करायला हवेत" अस त्यांनी म्हटल आहे. "त्यामध्ये काही मजा नाही आणि दम सुध्दा नाही" असं ते पुढे म्हणाले.
"गेहलोत सरकार ची कामगिरी चांगली होती पण राजस्थान मध्ये सत्ता बदलाची परंपरा आहे. त्यानुसार निकाल आहे" असही ते म्हणाले. छत्तीसगड मध्ये काँग्रेसचा पराभव काँग्रेससाठी व इंडिया आघडी साठी चिंतनाचा विषय आहे. सर्वात जास्त विजयाची अपेक्षा इथे होती असही ते पुढे म्हणाले.
मध्यप्रदेश च्या निकालाविषयी बोलताना. "मध्यप्रदेश मध्ये काटेकी टक्कर होती पण 'लाडली बेहना योजना' भाजप साठी फलदायी सिद्ध झाली असल्याचे मत ही राऊत यांनी व्यक्त केलं आहे. लाडली बेहना योजनेत महिलांच्या खात्यात थेट पैसे जात होते अस म्हणत त्यांनी या योजनेला महिलांची मते विकत घेण्याचे मशीन म्हटले आहे.
राजस्थान, मध्यप्रदेश,छत्तीसगड तेलंगणा या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी सुरू आहे. जवळपास सर्व राज्यातील सत्तास्थापनेच चित्र स्पष्ट होत आहे. आत्तापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार भारतीय जनता पक्षाला राजस्थान, छत्तीसगड व मध्यप्रदेश या तिन्ही राज्यात स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर तेलंगणा मध्येही भाजपने 9 जागांवर आघाडी घेतली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त १ जागेवर समाधान मानावे लागले होते.
आत्तापर्यंत च्या आकडेवारीनुसार राजस्थान मध्ये भाजप ११५ जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस ७० जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगड मध्ये भाजप ५४ जागांवर तर काँग्रेस ३६ जागांवर आघाडीवर आहे. आणि मध्यप्रदेश मध्ये भाजप तब्बल १६६ जागांवर आघाडीवर आहे काँगेसला मात्र ६३ जागांवर समाधान मानावे लागल आहे.