'इंडी' आघाडीने कितीही बैठका घेतल्या, तरी नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील : उदय सामंत
25-Dec-2023
Total Views | 44
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'इंडी' आघाडीने बैठकांचा धडाका लावला आहे. मात्र, त्यांच्या कितीही बैठका झाल्या, तरी त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरणार नाही आणि लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा ठाम विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. सोमवार, २५ डिसेंबर रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उदय सामंत म्हणाले की, "'इंडी' आघाडीकडे पंतप्रधान मोदी यांच्यासमोर उमेदवारच नाही. तीन राज्यांच्या झालेल्या निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ झाला आहे. त्यामुळे त्यांनी कितीही बैठका घेतल्या, तरी काही फरक पडत नाही," असा टोला त्यांनी लगावला.
जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्या वक्तव्यांबाबत सामंत यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले की, "त्यांना आता रोज काय सांगायचे? मी त्यांना अनेकदा विनंती केली. आपण सगळे जात, पात, धर्मभेद विसरून एकत्र राहतो. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण काढून घेतले जाणार नाही आणि मराठा समाजालाही आम्ही आरक्षण देणार आहोत. त्यामुळे जरांगे-पाटील आणि भुजबळसाहेबांना माझी विनंती आहे, जातीजातीमध्ये तेढ निर्माण होईल, अशा प्रकारची वक्तव्ये त्यांनी टाळावी.