'इस्रायलला तेल पुरवठा थांबवा'; इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींचे मुस्लीम उम्माला आवाहन
01-Nov-2023
Total Views | 90
तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी मुस्लिम देशांना इस्रायलला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे आवाहन केले आहे. गाझा पट्टीत इस्रायलचे सुरू असलेले अत्याचार संपवण्यासाठी एकत्रितपणे काही पावले उचलण्याची गरज असल्याचे खोमेनी म्हणाले. इस्रायलवर अनेक प्रकारचे निर्बंध लादले जातील आणि तेल आणि इतर गोष्टींची निर्यातही थांबवावी लागेल. यामुळे इस्रायलवर दबाव येऊन गाझामधील हल्ले थांबवण्यास भाग पाडले जाईल.
गाझा पट्टीत इस्रायली सैन्य ज्या प्रकारचे अत्याचार करत आहे ते भयावह आहे, असे ते म्हणाले. सर्व अत्याचार सहन करूनही पॅलेस्टाईनचे लोक जी जिद्द आणि प्रतिकार दाखवत आहेत ते आश्चर्यकारक आहे, असे विधानही त्यांनी केले. खामेनी म्हणाले की, गाझामधील अत्याचार थांबवण्यासाठी मुस्लिम देशांनी एकजूट दाखवणे गरजेचे आहे. गाझामधील इस्रायलचे गुन्हे तात्काळ थांबवावेत हा मुस्लिम देशांनी आग्रह धरला पाहिजे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, गाझावर इस्रायली हल्ला थांबवण्यासाठी त्यांनी इस्त्रायली सरकारला तेल आणि इतर वस्तूंची निर्यात थांबवावी. मुस्लिम देशांनी इस्रायली राजवटीला आर्थिक सहकार्य करू नये, असे खोमेनी म्हणाले. इस्रायल हमास युद्धात इराणने दहशतवादी संघटना हमासचे समर्थन केले आहे. इस्रायलने इराणवर हमासला शस्त्र पुरवठा केल्याचा आरोप केला.