भूमिगत मेट्रोमध्ये विनाअडथळा मोबाईल नेटवर्कचा वापर करता येणार

    02-Oct-2023
Total Views | 43
Mobile Network Available In Underground Metro Lines

मुंबई :
आरे ते कफ परेड अर्थात कुलाबा-वांद्रे-सीप्झ भूमिगत मेट्रो मार्गिकेची प्रत्येक मुंबईकर आतुरतेने वाट पाहत असून या भूमिगत अर्थात अंडरग्राउंड मेट्रोतून प्रवास करताना मोबाईल नेटवर्कमध्ये अडथळा येण्याच्या मुंबईकरांच्या समस्येवर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अर्थात एमएमआरसीने उपाय शोधला आहे. भूमिगत मेट्रोमधून प्रवास करताना मोबाईल नेटवर्कमध्ये अडथळा येऊ नये यासाठी जमिनीखाली २० मीटर खोलपर्यंत अँटेना बसविले जाणार असल्याची माहिती 'एमएमआरसी'च्या अधिकाऱ्याने दिली आहे. तसेच आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा डिसेंबरपासून सुरू होण्याची शक्यता देखील येत आहे.

मेट्रो ३ ही राज्यातील पहिली भूमिगत मेट्रो मार्गिका असून आरे ते बीकेसी हा या मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा असणार आहे. तसेच या मार्गिकेसाठी तिकीट खिडकी देखील जमिनीच्या खाली १०.१४ मीटर तर प्रत्यक्ष स्थानकांचे फलाट हे जमिनीच्या खाली १८ ते २० मीटर खोलीवर असणार आहेत. भूमिगत मेट्रोतील सर्वात महत्त्वाचे आवाहन म्हणजे प्रवाशांना विनाअडथळा मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून देणे. याकरिता एमएमआरसीकडून सौदी अरेबियाच्या कंपनीसोबत करार करण्यात आला आहे.

एमएमआरसीने सौदी अरेबियातील रियाध शहरातील ‘एसेस’ या कंपनीच्या एसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनीला निविदा प्रक्रियाद्वारे कंत्राट दिले असून कंपनीने खासगी मोबाइल सेवा कंपन्यांकडून सेल्युलर कव्हरेज उपलब्ध करण्याची योजना आखली असल्याची माहिती समोर आली आहे. या खासगी कंपन्यांसाठी एसेस इंडिया ही कंपनी भुयारी मार्गातील स्थानके आणि बोगद्यांमध्ये अँटेना आणि रिपिटर्स बसविणार असून त्यामुळे मेट्रो ३ भुयारी मेट्रो मार्गिकेतुन प्रवास करताना प्रवाशांना मोबाइल आणि इंटरनेट सेवा विनाअडथळा वापरता येणार आहे.


अग्रलेख
जरुर वाचा
महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे : पद्मश्री गिरीश प्रभुणे

लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश राजवटी विरोधात सर्व भारतीयांना एकत्र करून स्वातंत्र्यलढा हा देश पातळीवरून नेला. स्वदेशी,स्वधर्म जागरूत करून राष्ट्रीय शिक्षणावर भर दिला. या सर्व कामासाठी त्यांना तुरुंगात जावे लागले.आपल्याला महापुरुषांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम करायचे आहे.‘असे पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले. नुकतेच मातंग साहित्य परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संज्ञापन व वृत्तपत्र विभाग व अण्णा भाऊ साठे अध्यासन यांच्या वतीने लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महर्षी विठ्ठल रामजी ..

ओला, उबेरची स्पर्धा थेट राज्य सरकारशी राज्य सरकारच चालवणार अ‍ॅप आधारित टॅक्सी आणि इ बाईक

ओला, उबेरची स्पर्धा थेट राज्य सरकारशी राज्य सरकारच चालवणार अ‍ॅप आधारित टॅक्सी आणि इ बाईक

"राज्य सरकार मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅप आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याच्या विचारात असुन प्रवासी वाहतुकीसाठी अ‍ॅप आधारित रिक्षा,टॅक्सी व ई-बाईक सेवा आता खासगी कंपन्यांपुरती मर्यादित न राहता, परिवहन विभागाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार आहे. याॲपला जय महाराष्ट्र, महा-राईड, महा-यात्री, महा-गो यापैकी एखादे नाव देणे प्रस्तावित आहे,अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्य सरकारच्या अंतिम मान्यतेने हे शासकीय ॲप लवकरच कार्यान्वित होईल असा विश्वास त्यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121