नोटबंदी हे देशातील 'आर्थिक हत्याकांड'! : संजय राऊत

    03-Jan-2023
Total Views | 49


नोटबंदी हे देशातील 'आर्थिक हत्याकांड'! : संजय राऊत
मुंबई : "नोटाबंदी हे आर्थिक हत्याकांड होतं. नोटाबंदीमुळे बेरोजगारी निर्माण झाली. हजारो लोक बँकांच्या रांगेत मरण पावली. नोटाबंदीमुळे अनेकांनी रोजगार गमावला. रोजगार गेल्यामुळे लाखो लोकांनी आत्महत्या केल्या. या आर्थिक हत्याकांडाला जबाबदार कोण, याचं उत्तर न्यायालयाने दिलं नाही. त्याचा फायदा काय झाला, कोणाला झाला, याचं उत्तर न्यायालायने द्यावं." अशी टीका उ. बा. ठा. गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
 
 
पुढे ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक येऊन सांगितलं की पाचशे आणि हजाराच्या नोटा आजपासून बंद. यामुळे काळापैसा वाचेल. टेरर फिंडिंग बंद होईल. चलनातील बनावट नोटा संपून जातील, असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. मात्र, झालं उलटंच. बनावट नोटांचं प्रमाण वाढलंय, काश्मीरसह देशभरात दहशतवाद कमी झाला नाही. काळा पैसा वाढला, मग नोटाबंदी वैध कशी?" असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
 
 
शिंदे गट हा स्वत:ला टोळी मानत आहे. हे बरोबर आहे. कारण जागा वाटपात त्यांना एकही जागा नको आहे. पण शिवसेना मात्र यापुढेही संघर्ष करत राहील. तर जितके दिवस शिंदे गट सत्तेचे आहे त्यात खंडण्या गोळा करायच्या आणि नंतर परदेशात पळ काढायचा असं त्यांचं नियोजन असेल, असेही राऊत यावेळी म्हणाले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121