मुंबई : मुंबई देशाची आर्थिक राजधानी. मुंबईवर झालेला हल्ला हा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा आघात ठरू शकतो. याच समजुतीतून अनेक दहशतवादी संघटनांनी मुंबईवर हल्ले केले आहेत. २००८ सालचा दहशतवादी हल्ला हा आता पर्यंत झालेल्या हल्ल्यांपैकी सर्वात क्रूर हल्ला होता. त्याच हल्ल्याच्या स्मृती जाग्या झाल्या आहेत कारण मुंबई पोलिसांना आलेला व्हाट्सअँप आलेला एक धमकीचा मेसेज. गुरुवारी रात्री मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हाट्सअँपवर हा धमकीचा मेसेज आला आणि मुंबईची पोलीस यंत्रणा पुन्हा एकदा अलर्टवर गेली.
पाकिस्तानशी संबंधित असलेल्या नंबर वरून हा मेसेज आला आहे. सोमालियावर नुकताच ज्या पद्धतीने दहशतवादी हल्ला झाला त्याच पद्धतीने मुंबईवर पुन्हा एकदा हल्ला करण्यात येईल हा हल्ला २६/ ११ सारखाच हल्ला असेल असेही त्या मेसेज मध्ये म्हटले आहे. गुरुवारी रात्री ११.३०च्या दरम्यान हा मेसेज आला आणि अख्खी पोलीस यंत्रणा कामाला लागली. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत.
२६/११ चा हल्ला हा मुंबईकरांच्या काळया स्मृतींपैकी एक घटना आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटनांकडून प्रशिक्षण घेऊन आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईतील ताज, ट्रायडंट यांसारख्या पंचतारांकित हॉटेल्ससह छत्रपती शिवाजी टर्मिनस सारख्या मुंबईकरांच्या महत्वाच्या इमारतीही लक्ष्य करण्यात आल्या होत्या. त्या सर्व दहशतवाद्यांपैकी फक्त कसाबलाच जिवंत पकडण्यात यश मिळाले होते, मुंबईकर काळाच्या ओघात पुढे आले असले तरी त्या घटनेच्या स्मृती अजूनही पुसल्या गेली नाहीत. मुंबईसारखे भारताचे महत्वाचे आर्थिक शहर लक्ष्य करून भारताची शांतता बिघडवण्याचा सातत्याने करण्यात येत असेलला पाकिस्तान सारख्या देशांचा प्रयत्न कशीही लपून राहिलेला नाही.