४ बँकांच्या मुदतठेवींवरील व्याजदरात वाढ

‘आरबीआय’च्या रेपोदरातील वाढीचा परिणाम

    20-Aug-2022
Total Views | 93
RBI
 
नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गेल्या दोन महिन्यांत ‘रेपो’ दरात तीन वेळा वाढ केली आहे. यानंतर बँकांमध्ये बचत योजनांवरील व्याजदर वाढवण्याची स्पर्धा लागली आहे. ‘रेपो’ दरात वाढ केल्यानंतर विविध बँकांमधील मुदतठेवींवरील अर्थात ‘एफडी’वरील व्याजदर वाढत आहेत. खासगी ते सरकारी बँकांकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘एफडी’च्या व्याजदरात वाढ होत आहे. दरम्यान खासगी ते सरकारी बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘एफडी’च्या व्याजदरात वाढ केली आहे. नुकत्याच चार मोठ्या बँकांनी एकाच दिवसात ‘एफडी’चे व्याजदर वाढवण्याची घोषणा केल्याने वेगवेगळ्या तारखांपासून लागू करण्यात आलेली वाढ ग्राहकांसाठी अधिक फायद्याची ठरली आहे. मात्र, व्याजदरातील ही वाढ वेगवेगळ्या तारखांपासून लागू झाली आहे. ज्या बँकांनी व्याजदरात बदल केला आहे, त्यात ‘आयडीएफसी फर्स्ट बँक’, ‘एचडीएफसी बँक’, ‘पंजाब नॅशनल बँक’ आणि ‘कोटक महिंद्रा बँक’ यांचा समावेश आहे.
 
देशातील सर्वात मोठी खासगी बँक ‘एचडीएफसी’ने पुन्हा एकदा व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने केवळ दोन कोटी रुपयांपेक्षा कमी ‘एफडी’वरच व्याज वाढवले आहे. आता एक वर्ष ते दोन वर्षांच्या मुदतीच्या ‘एफडी’वर ५.५० टक्के व्याज मिळेल. ‘पंजाब नॅशनल बँके’ने सोन कोटी रुपयांपेक्षा कमी मुदतठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे. बँकेचे नवे दर १७ ऑगस्टपासून लागू झाले आहेत. इतर बँकांप्रमाणेच, ‘आयडीएफसी’ बँकेनेही दोन कोटींपेक्षा कमी ’एफडी’वरील व्याजात वाढ केली आहे. नवीन दर दि.१६ ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत. ‘कोटक महिंद्रा बँके’ने ‘एफडी’वरील व्याजदर ३९० दिवसांवरुन तीन वर्षांपर्यंत वाढवला आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार, नवीन दर १७ ऑगस्टपासून लागू होतील.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मनसेला झटका! अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई

मनसेला झटका! अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई

(Avinash Jadhav) मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून मराठीवरुन वातावरण चांगलेच तापले आहे. अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मीरा-भाईंदर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (८ जुलै) मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत प्रतिबंधात्मक कारवाईला सुरूवात केली आहे. सोमवारपासून पोलिसांनी मनसे आणि उबाठाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी पहाटे पोलिसांनी आणखी कठोर पाऊल उचलत मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश ..

मेट्रोला विलंब झाल्याने घाटकोपर स्थानकात तुफान गर्दी

मेट्रोला विलंब झाल्याने घाटकोपर स्थानकात तुफान गर्दी

मेट्रोचे डबे वाढविण्याची प्रवाशांची मागणी अतिरिक्त कोच खरेदीसाठी मेट्रो वनचा प्रस्ताव मुंबई मेट्रो मार्ग १ वर तांत्रिक बिघाडामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवार,दि.७ रोजी प्रवाशांची विशेषतः कार्यालयात जाणाऱ्या मुंबईकरांची प्रचंड तारांबळ उडाली. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेला उशीर झाल्याने बघता बघता घाटकोपर स्थानकासह इतर स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली. मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेला उशीर झाल्याने गर्दी वाढली आहे. टार्गेट स्पीड गाठू न शकल्याने एक ट्रेन ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121