मुंबई : संजय राऊतांना गजाआड व्हायला लावणाऱ्या पत्रचाळ प्रकारणात ईडीकडून पुन्हा एकदा छापेमारी सुरु करण्यात आली आहे. बुधवारी ईडीकडून मुंबईत छापा सत्र सुरू झाले आहे. काही बांधकाम व्यावसायिक हे आता यावेळी ईडीच्या रडारवर आहेत. या व्यावसायिकांची नावे अद्याप तरी समोर आली नसली तरी ही याच पत्राचाळ प्रकरणात ही चौकशी सुरु झाल्याचे निश्चित आहे. आता पर्यंत दोन ठिकाणी ईडीने आपले सर्च ऑपरेशन सुरु केल्याची माहिती मिळत आहे.
गोरेगावचे पत्राचाळ प्रकरण आत चांगलेच गाजते आहे. याच प्रकरणात शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात अजून कोणती नवे समोर येतात हे बघणे महत्वाचे ठरेल. मध्यंतरी काही नगरसेवकांची नावे या प्रकरणात समोर येत होती पण निश्चित नावे अजूनही समोर आलेली नाहीत. या सगळ्याच अनिश्चिततेमुळे या प्रकरणात नव्याने सुरु झालेली ही कारवाई नेमकी कोणा विरोधात आहे हे अजून तरी समोर आलेले नाही.
गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रक्रल्पात म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून जमिनीचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील बांधकाम व्यावसायिक प्रवीण राऊत हे प्रमुख आरोपी असून संजय राऊत यांचे व्यावसायिक भागीदार देखील आहेत. ईडीने या प्रकरणात केलेल्या चौकशीत हे सर्वच लागेबांधे उघड झाले होते त्यामुळे बुधवारी होणाऱ्या कारवाईत अजून कुठल्या नेत्याचे नाव समोर येते का ? ते बघणे महत्वाचे आहे.