काश्मीरमध्ये सुरू होणार पहिले मल्टीप्लेक्स!

    16-Aug-2022
Total Views | 89

jk
 
 
जम्मू - काश्मीर: जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर येथे राज्यातले पहिले मल्टिप्लेक्स लवकरच सुरू होणार आहे. दहशतवादी हिंसेचे थैमान घालत असल्यामुळे देशाच्या उर्वरित भागांमध्ये मल्टिप्लेक्सची साखळी निर्माण झाली. तरी, जम्मू काश्मीरमध्ये एकही मल्टिप्लेक्स नव्हते. लवकरच जम्मू काश्मीरमध्ये राज्यातले पहिले मल्टिप्लेक्स सुरू होत आहे.
 
जम्मू काश्मीरमध्ये आधी सिंगल स्क्रीन थिएटर होती. पण दहशतवादी कारवाया वाढू लागल्या आणि हळू हळू थिएटर बंद झाली. सिनेमा बघण्यासाठी संध्याकाळी किंवा रात्री घराबाहेर पडण्याचे प्रमाण एकदम कमी झाले. पण कलम ३७० आणि ३५ अ हटविल्यानंतर आणि सुरक्षा पथकांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केल्यानंतर परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली आहे.
 
जम्मू काश्मीरमधील पहिल्या मल्टिप्लेक्समध्ये तीन थिएटर मिळून ५२० आसनांची सोय आहे. श्रीनगरचे व्यावसायिक विकास धर आणि आयनॉक्स लेश्युअर संयुक्तपणे मल्टिप्लेक्स सुरू करत आहेत. या मल्टिप्लेक्समधील तिन्ही थिएटरमध्ये टू के रिझोल्युशनच्या स्क्रीन, टू के लेझर प्रोजेक्टर, ७.१ चॅनल साउंड सिस्टिम, आरामदायी आसने (रिक्लाइनर) अशी व्यवस्था आहे. या मल्टिप्लेक्सचा शुभारंभ सप्टेंबर २०२२च्या पहिल्या पंधरवड्यात होणार आहे.
 
 
जम्मू काश्मीरच्या नागरिकांसाठी सिनेमा बघण्याची आधुनिक आणि उत्तम सोय मल्टिप्लेक्समुळे निर्माण होणार आहे. यामुळे राज्यातील पहिल्या मल्टिप्लेक्सचे नागरिक उत्साहाने स्वागत करतील आणि उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास विकास धर यांनी व्यक्त केला.
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
कुर्ल्यातील रोहिंग्या-बांग्लादेशींच्या झोपड्यांना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा खोटा आरोप?

कुर्ल्यातील रोहिंग्या-बांग्लादेशींच्या झोपड्यांना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा खोटा आरोप?

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा सवाल कुर्ल्यातील महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरातील जंगल तोडून स्विमिंग पूल बांधत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केल्यानंतर कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. “तिथे स्विमिंग पूल नव्हे, तर शिवकालीन पारंपरिक खेळांचं मैदान उभं राहत आहे. आदित्य ठाकरेंचा खरा उद्देश त्या परिसरातील रोहिंग्या-बांगलादेशींच्या अनधिकृत झोपड्यांना वाचवण्याचा आहे का?” असा सवाल मंत्री लोढा यांनी उपस्थित केला आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121