मुंबई : मुंबई तसेच किनापट्टीच्या सर्वच प्रदेशांना बुधावारीही अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचे आहेत कारण या काळात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने सर्वच नागरिकांना तसेच मच्छीमारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
बुधवारी पौर्णिमा असल्याने समुद्राला उधाण आहे, मुसळधार पाऊस आणि खवळलेला समुद्र अशी स्थिती या दिवशी मुंबईकरांसाठी असणार आहे. गेले काही दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस होत असल्याने वाहतूक कोंडी, मंदावलेली रेल्वेसेवा या सगळ्यांमुळे आधीच ट्रस्ट झालेल्या मुंबईकरांसाठी बुधवारचा दिवसही परीक्षा घेणारा ठरणार आहे.