पुरावा म्हणून आणलेला बॉम्ब फुटला कोर्टात

बिहारच्या राजधानीत घडला प्रकार

    01-Jul-2022
Total Views | 144
Patna
 
 
 
पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथील दिवाणी न्यायालयात बॉम्बस्फोट झाला. शुक्रवारी दि. १ जून रोजी झालेल्या स्फोटात एक हवालदार जखमी झाला होता. मोठी बाब म्हणजे हा बॉम्ब पुरावा म्हणून न्यायालयात आणला होता, जेणेकरून तो संबंधित खटल्याच्या न्यायाधीशांना दाखवता येईल. मात्र त्याचवेळी बॉम्बचा स्फोट झाला. स्फोटानंतर कोर्टात गोंधळ उडाला. धूर ओसरल्यावर बॉम्ब आणणारा हवालदार जखमी झाल्याची माहिती मिळाली. मात्र या विचित्र घटनेने न्यायालयाच्या आवारात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

शुक्रवारी दि. १ जून रोजी न्यायालयात एका खटल्याचा पुरावा म्हणून कदमकुआ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी हा बॉम्ब आणल्याचे सांगण्यात आले आहे. हा बॉम्बप्रकरणातील पुरावा होता, मात्र यादरम्यान अचानक बॉम्बचा स्फोट झाला आणि या स्फोटात कदमकुआ पोलीस ठाण्याचे निरीक्षक जखमी झाले. जखमी इन्स्पेक्टरला तातडीने पीएमसीएचमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. उमाकांत राय असे अपघातात जखमी झालेल्या निरीक्षकाचे नाव आहे. न्यायालयात पुरावा म्हणून त्यांनी बॉम्ब आणला होता. तो बॉम्ब घेऊन ते फिर्यादी कार्यालयात गेले. मात्र फिर्यादी कार्यालयातच बॉम्बचा स्फोट झाला.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121