यंदा हिंदमाता आणि मिलन सबवे तुंबणार नाही : आदित्य ठाकरे

    17-Jun-2022
Total Views | 46

aditya thackeray 
 
 
 
मुंबई : थोडासा पाऊस जरी पडला तरी पाण्याखाली जाणाऱ्या मुंबईतील हिंदमाता आणि मिलन सबवेमध्ये यंदा पाणी भरणार नसल्याचा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. हिंदमाता आणि मिलन सबवे येथे साठवण टाक्यांची निर्मिती करण्यात आली असून या टाक्यांमुळे यंदा पावसात इथे पाणी तुंबणार नाही अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
 
"पावसाळा सुरु झाला की मिलन सबवे आणि हिंदमाता या दोन ठिकाणी पाणी तुंबण्याची भीती मुंबईकरांना असते. आम्ही सर्व राजकीय मंडळी आणि पत्रकार पहिल्यांदा तेथे जाऊन पाहणी करत असतो. हिंदमाता जवळ सेंट झेविअर्स फुटबॉलच्या ग्राऊंडजवळ एका साठवण टाकीचे काम हे पूर्ण झाले असून दुसऱ्या टाकीचे काम सुरु आहे. तसेच गांधी मार्केटजवळही साठवण टाकी बनविण्यात आली असून त्या टाकीचे काम देखील व्यवस्थित पूर्ण झालेले आहे." त्याचबरोबर प्रमोद महाजन उद्यानाजवळ देखील साठवण टाकी तयार करण्यात येणार असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.
 
"तसेच मिलन सबवे येथे तुंबणाऱ्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी तेथील लायन्स क्कबलच्या मैदानाखाली देखील टाक्या तयार करण्यात येत आहेत. तसेच या टाक्यांचे काम प्रगतीपथावर असून आतील पायलिंगचे काम झालेले आहे. त्यामुळे वेळ पडल्यास येथेही पाणी साठवू शकतो. पुढील दहा ते पंधरा दिवसांमध्ये पाणी येथे अडवून ते बाहेर फेकण्याची सोय आपण निर्माण करु शकू. दरम्यान पुढील वर्षासाठी ही टाकी पूर्णतः तयार होईल. हिंदमाता, प्रमोद महाजन उद्यान आणि गांधी मार्केटमधील अशा साठवण टाक्या यशस्वी ठरलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईत जेथे जेथे पाणी तुंबण्याची शक्यता आहे तेथे अशा साठवण टाक्या करण्यात येतील," अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121