मुंबई : जुन्या लाल परीच्या जागी आत्ता नवीन बसेस येणार आहेत. एसटी महामंडळाने ५०० साध्या बसेस भाडेतत्वावर देणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील ३२० बस पुढील दोन ते तीन महिन्यात येतील. आरामदायी पुश बॅक आसनसुविधा आणि आकर्षक रंगसंगतीअसलेल्या बसेस मधून प्रवाश्यांना प्रवास करता येणार आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात एकूण १५ हजार ८७७ हजार गाड्या असून, त्यात साध्या बस, निमआराम, स्वमालकीच्या भाडेतत्त्वावरील शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध गाडय़ा आहेत. एसटी महामंडळाने वर्षभरात नवीन बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात ५०० लाल रंगाच्या साध्या बसेस आहेत. एसटी महामंडळाने ५०० नवीन बसेस दाखल करण्याचा निर्णय साधारण आठ ते दहा महिन्यांपूर्वीच घेतला होता. आता ५०० पैकी ३२० बसेसच्या निविदा काढून त्याचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.