मुंबई : अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांचा ‘लाल सिंग चड्ढा' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'माँ कहती है जिंदगी गोलगप्पे की तरह होती है, पेट भरता है लेकीन मन नहीं भरता’ हा डायलॉग ट्रेलरमध्ये ऐकायला येत आहे.
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर प्रेक्षकांनी त्यास भरघोस प्रतिसाद दिला आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट, १९९४ मध्ये प्रदर्शित झालेला आणि ऑस्कर पुरस्कार जिंकलेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या अमेरिकन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. येत्या ११ ऑगस्ट रोजी हा चित्रपट सिनेगृहात प्रदर्शित होणार आहे.