पुणे: ''शनिवारी (१४ मे ) रोजी मुंबईतील सभेत भाषण करताना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या विकासाच्या अनेक मुद्द्यांवर जसे की पेट्रोल-डिझेलच्या दारांना कमी करायची जबाबदारी घेण्यास विसरले. तसेच दाऊदच्या टोळीशी व्यवहार करण्याऱ्या एका नेत्याला आपण मंत्रिमंडळात ठेवले आहे हे देखील विसरले असून, आता त्यांना मुख्यमंत्री पदाचे देखील विसर पडलेले दिसले'', असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
महागाईबद्दल का बोलत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला असून, आता राज्यातील पेट्रोल डिझेलवरील कर कमी करा म्हणून पंतप्रधानांनी सांगितल्याचाही त्यांना राग आला. पण उद्धव ठाकरे विसरले की, पेट्रोल डिझेलवरील व्हॅटच्या दरात कपात करून त्यांचे सरकार महाराष्ट्रातील जनतेला महागाईपासून मोठा दिलासा देऊ शकते'', अशी टीकाही त्यांनी केली.
राज्यात पुन्हा लोडशेडिंग व शेतकऱ्यांची वीज कनेक्शन मोठ्या प्रमाणात कापल्या गेल्याचा उल्लेखही त्यांनी केला असून, विकासकामे म्हणून मुंबई महापालिकेने केलेले शाळांचे काम सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आपण मुख्यमंत्री असल्याचा विसर पडलेला दिसला'', अशा शब्दांमध्ये चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाला प्रत्युत्तर दिले.