नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक घोषित केली आहे. येत्या १० जुनला या निवडणूका पार पडणार असल्याचे जाहीर केले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, ही निवडणूक एकूण १५ राज्यांमध्ये, ५७ जागांसाठी घेण्यात येणार आहे.
दरम्यान, यावेळी उत्तर प्रदेशातील निवडणूकांकडे विशेष लक्ष आहे. या राज्यात एकूण ११ जागा रिक्त होत आहे. निवडणुकीची अधिसूचना २४ मे रोजी जाहीर केली जाणार असून, उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी ३१ मे शेवटची तारीख आहे. उमेदवारी अर्ज निवडीसाठी १ जून तर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ३ जून आहे. या ५७ जागांसाठी १० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत मतदान होणार आहे.
राज्यनिहाय्य निवडणूकाच्या जागा पुढील प्रमाणे :
महाराष्ट्र ६
आंध्र प्रदेश ४
तेलंगण २
छत्तीसगड २
मध्य प्रदेश ३
तामिळनाडू ६
कर्नाटक ६
ओडिशा ३
पंजाब ४
राजस्थान १
उत्तराखंड १
बिहार ७,
हरियाणा २