दलालांकडून रेल्वे आरक्षण करतायं! सावधान!

दलालांकडून १२०.६४ लाख किंमतीची ७,७७४ तिकिटे जप्त

    27-Mar-2022
Total Views | 101

central railway
 
मुंबई : मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांची आरक्षणे सुरु होताच, काही मिनिटांत आरक्षित तिकीटे मिळत नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारींचा पाऊस पडल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाने खाजगी ट्रॅव्हल्स एजन्सीवर धाडी टाकल्या. त्यांच्याकडून १२०.६४ लाख किंमतींची ई तिकीटे आणि काऊंटर तिकिटांसह ७,७७४ तिकिटे जप्त करण्यात आली.आरक्षण तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि अधिकृत प्रवाशांकरीता ही मोहीम तीव्र केली आहे. सायबर सेलकडून आणि इतर स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीआधारे ही कारवाई करण्यात आली.
 
 
एप्रिल २०२१ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत दलालीची २६७ प्रकरणे नोंदवण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत ३२८ जणांना रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत अटक झाली आहे. २६७ गुन्ह्यांपैकी २०२१ एप्रिल ते २०२२ फेब्रुवारी या वर्षात फक्त मुंबई विभागात दलालीचे १२१ गुन्हे दाखल झाले व आतापर्यंत १५९ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ७४.०६ लाख रुपयांची ई-तिकीट आणि काउंटर तिकिटांसह ४,४७८ तिकिटे जप्त केली.
 
म. रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने ‘प्रबल’आणि इतर विविध सॉफ्टवेअरने सुसज्ज असलेला आयटी सेल आणि कौशल्य विकास केंद्र स्थापन केले. ते ई- टाउटिंग तपास, सायबर स्पेस पाळत ठेवणे, सीसीटीव्ही मॉनिटरिंग आदींकरीता सहाय्य करत आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत आरपीएफने ३१६ प्रकरणे नोंदवली आणि १६७.५९ लाख किंमतीची १०,१७९ तिकिटे जप्त केली होती. प्रवाशांनी ऑनलाईन ई-तिकीटमध्ये गुंतलेल्या दलालांकडून तिकिटे खरेदी करू नयेत. ते अशा तिकीटांसह त्यांचा प्रवास करू शकत नाहीत शिवाय कायदेशीर कारवाईमुळे तिकीट ब्लॉक केल्यास त्यांचे पैसेही बुडतील, असा सल्ला म. रेल्वेने दिला आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121