दाऊदशी संबंधित महाराष्ट्रातील तीन नेत्यांना होणार अटक?

केंद्रीय तपास यंत्रणा "त्या" नेत्यांना दणका देण्याच्या तयारीत

    09-Feb-2022
Total Views |

Maha MTB




मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी भागीदारीचे संबंध ठेवल्या प्रकरणी महाराष्ट्रातील तीन बडे नेते अडचणीत येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात तपास यंत्रणांच्या कारवाईचा वाढलेला वेग पाहता पुढील काही दिवसांत ही कारवाई होईल, असा इशारा खात्रीलायक सुत्रांनी दिला आहे. यात दाऊदशी संबंधित या तीन नेत्यांना पुढील काही दिवसांत कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांचे दाऊदशी व्यावसायिक भागीदारीचे संबंध आहेत, असे आरोप प्रत्यारोप गेल्या काही दिवसांत पहायला मिळाले. या संदर्भातील दस्तावेजही तपास यंत्रणांना सादर करण्यात आले होते. याच संदर्भातील चौकशीसाठी बोलविण्यात येणाऱ्या आरोपींपैकी मंडळींपैकी तिघे जण राजकीय क्षेत्रातील, असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील राजकिय क्षेत्रात मोठी खळबळजनक घटना घडू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.


केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवार दि. ७ फेब्रुवारी रोजी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कारवाई करण्याची जबाबदारी राष्ट्रीय तपास संस्थेला (NIA) दिली आहे. एनआयएने दाऊद इब्राहिम, डी कंपनी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध बेकायदेशीर प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) विरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संदर्भात, तपास यंत्रणांनी माहिती जाहीर केली आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रथमच पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तैनात करण्याची ही पहिलीच वेळ आहे, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आतापर्यंत दाऊदवर संबंधित प्रकरणांचा तपास करत होती.


केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता एनआयए परदेशात जाऊन त्याच्यावर कारवाई करू शकते. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, डी कंपनी आणि दाऊद इब्राहिम टेरर फंडिंग, नार्को टेरर, ड्रग्स स्मगलिंग आणि फेक करन्सी (एफआयसीएन) चा व्यवसाय करून भारतात दहशत पसरवण्याचे काम करत आहेत. दाऊद लष्कर-ए-तैयबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेएम) आणि अल कायदाच्या माध्यमातून भारतात दहशतवादी कारवाया करत आहे. त्याचवेळी एनआयएच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की, दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांची नावे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आली आहेत.


इस्मामिक देशांचा पाठींबा ठरणार महत्वाचा!

आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या विश्लेषकांनी या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, "सौदी अरेबियासह मध्य आशियातील इस्लामिक देशांशी मोदी सरकारने चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. दहशतवादाच्या मुद्द्यावरुन वेळोवेळी पाकिस्तानला भारताने खडसावल्यानंतर कुठलाही देश पाकच्या बाजूने उभा राहिलेला नाही. दाऊद संदर्भातील सुरू करण्यात आलेल्या या कारवाईतही भारताच्या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान दबाव आणू शकत नाही."





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121